Home यवतमाळ स्कूल ऑफ स्कॉलर्स, यवतमाळ येथे विद्यार्थी परिषदेचा शपथविधी समारंभ

स्कूल ऑफ स्कॉलर्स, यवतमाळ येथे विद्यार्थी परिषदेचा शपथविधी समारंभ

175

 

यवतमाळ: :–  स्कूल ऑफ स्कॉलर्स, यवतमाळ येथे नुकताच विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न झाला व शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली.
लोकशाही प्रणालीनुसार शाळेमध्येही विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना पारदर्शकपणे करण्यात आली.
विजयी उमेदवारांची घोषणा, मंत्रिमंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे यासाठी उपक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोहारा पोलीस स्टेशनच्या पोलीस इन्स्पेक्टर दीपमाला भेंडे लाभल्या तसेच शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्रसिंह चौहाण, उपमुख्याध्यापिका रीना काळे, प्रशासकीय अधिकारी श्री. कृणाल वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
नवनिर्वाचित सदस्यांमध्ये शाळा कर्णधार म्हणून अरहम कोठारी आणि ईश्वरी फुटाणे यांची नेमणूक करण्यात आली. याचबरोबर उपकर्णधार म्हणून सार्थक तिखे व भार्गवी सराफ,
क्रीडा मंत्री अक्षय राठोड व उपक्रिडामंत्री आदित्य कळसकर. शिस्तपालन मंत्री खुशी दुधे व उप शिस्तपालन मंत्री समृद्धी येरावार , स्वच्छता मंत्री नंदिनी मालानी व उपस्वच्छता मंत्री आहाना बंग, सांस्कृतिक मंत्री श्रावणी कठाळे व उपसांस्कृतिकमंत्री राधे मिश्रा, परिपाठ मंत्री विदिता गुगलीया व उपपरिपाठमंत्री गीत खत्री , माहिती व प्रसारण मंत्री आरुष यंबरवार व आर्यन बोरकर , भाषा प्रमुख म्हणून मंदार मुंदे व मंदार गावंडे, तर सायबर मंत्री म्हणून वेदांत मालोदे व मानस येरावार यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन जबाबदारी स्वीकारली. याचबरोबर ब्लू हाऊस कॅप्टन जितेश कावना व नंदिनी काळे,रेड हाऊस कॅप्टन भक्ती शेटे व सावरी उत्तरवार,ग्रीन हाऊस कॅप्टन जय राजा व मंथन गादेवारआणि येलो हाऊस कॅप्टन देवर्षी जोल्हे व मनस्वी चौधरी यांची सुद्धा नेमणूक करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन, सिद्धिका ढवले आणि भुमी व्यास यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ सुषमा रावत यांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थी परिषदेचे प्रमुख सुजय इखार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला….