Home मराठवाडा भांबेरीतील उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार – आ. नारायण...

भांबेरीतील उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार – आ. नारायण कुचे

348

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

सरकारचे प्रतिनिधी म्हणून भांबेरीत आलेले आ.नारायण कुचे साहेब हे तातडीने भांबेरीतील उपोषण कर्त्यांच्या मागण्याबाबत मुख्यमंत्रींशी लगेच बोलणार आहे.मंत्रीमंडळाची एक बैठक घेऊन,भांबेरीतील आंदोलकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी मुंबईत जाऊन या सर्व मागण्याविषयी सविस्तर माहिती मांडणार आहे.

आ.नारायण कुचे पुढे असेही म्हणाले कि,सरकारचा प्रतिनिधी म्हणून जबाबदारीने या हजारोंच्या संख्येने बसलेल्या भांबेरीतील गावकर्‍यांना शब्द देतो की,या मागण्या मंजूर करण्यासाठी सरकार दरबारी जातोय.आता मात्र भांबेरीतील गावकरी सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहे.सरकारने तातडीने आमरण उपोषणाची दखल घ्यावी.निर्णयच घ्यावा.

नसता उपोषणकर्त्याच्या कोणाच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास सरकारच जबाबदार असेल.असेही सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेले आ. नारायण कुचे यांना गावकर्‍यांनी सांगितले आहे.नसता सरकारने मागण्या मंजूर कराव्यात,अशी मागणी भांबेरी येथील गावकऱ्यांनी आ.नारायण कुचे यांच्याकडे मांडली.

यावेळी सोबत उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस साहेब,भाजपा जिल्हा सरचिटणीस अवधुत खडके,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश टोपे,भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पालकर,पोलीस उपनिरीक्षक बल्लाळ साहेब,जिल्हा परिषद सदस्य डॉ. नंदकिशोर पिंगळे,विश्वजित खरात,काशिनाथ खंडेभाराड,भाऊसाहेब कणके,बाळासाहेब तायडे,राम शेळके,दत्ता जाधव,परमेश्वर लेंभे व उपस्थित सर्व मराठा समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.