Home जळगाव के.के.उर्दू शाळेतील मुख्याध्यापक अखिल खान ब्यावली यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा.

के.के.उर्दू शाळेतील मुख्याध्यापक अखिल खान ब्यावली यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा.

246

रावेर (शेख शरीफ)
जळगाव, येथील अंजुमने खिदमते खलक संचलित के.के‌ उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे मुख्यध्यापक अकील खान यांचा सेवानिवृत्त बद्दल” सेवापुर्ती सत्कार सोहळा संस्थाध्यक्ष डॉ. अमानुल्लाह शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले तर प्रमुख अतिथी म्हणून संस्था उपाध्यक्ष अल्हाज मजीद सेठ ज़करीया, खालीद बागबान व ज़ाहीद शाह हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात अल्हाज डॉ.अमानुल्लाह शाह यांनी सांगितले की शिक्षक हा समाजाला घडवणारा असतो तो कधीही सेवानिवृत्त होत नाही तो नेहमीच समाजाला दिशा दाखवणे व सतत मार्गदर्शन चे कार्य करत राहतो. अध्यक्षांच्या हस्ते सत्कार मुर्ती अकील खान यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापिका तनवीर जहा शेख यांनी अकील खान यांच्या कार्याचा उल्लेख केला यावेळी जाकीर शाह , मुश्ताक भिस्ती, रिजवाना सय्यद यांनीही आपले विचार व्यक्त केले . यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत यशस्वी विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले तसेच दानियानुरैन अकील शेख या विद्यार्थिनीने एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण करून समाजात आदर्श निर्माण केले असल्याने त्याचाही सत्कार पार पडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मझरोद्दीन शेख ,ज़ाकीर शाह.,नाजिया शेख व मोहसीन शाह यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक मंडळाचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.