Home महत्वाची बातमी पोलीस हे घरापेक्षा अधिक वेळ कार्यालयात आपले कर्तव्य…!

पोलीस हे घरापेक्षा अधिक वेळ कार्यालयात आपले कर्तव्य…!

170

“पोलीस हे घरापेक्षा अधिक वेळ कार्यालयात आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे पोलीस ठाणे अथवा कार्यालय पोलिसांसाठी घरापेक्षाही महत्वाची जागा असते.”
आणि याची प्रचिती आज बघायला मिळाली ते आमच्या सावदा पोलीस ठाण्यातील
एक शिस्तप्रिय, निष्ठावान व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून पोलीस दलात ज्यांची ओळख आहे, असे पो. नि. डी. इंगोले तसेच त्यांची टीम यांनी काल पाल जिल्हा जळगाव जवळ असलेल्या गारबर्डी येथील सुकी धरणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर मुक्ताईनगर येथील 9 तरुण अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये दगडावर अडकून बसले होते आणि हे त्या युवकांच्या लक्षात येण्याआधीच घडले त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली..
मात्र या सर्व प्रतिकूल परिस्थितीत पाऊस, रस्त्यातील नाले, सर्प, विंचू तसेच अन्य वन्य जीवांचा हल्ला होईल का याचा विचार न करता *इंगोले सर तसेच त्यांचे सहकारी व स्थानिक जिगर ठेवणारे काही तरुण* यांनी या सर्व युवकांना बचावले आणि सुखरूप मुक्ताईनगर येथील त्यांच्या घरी सोडले.
या बचाव कार्यात ज्या ज्या हिम्मतबाज तसेच माणुसकीने सज्ज अशा सहकार्य केलेल्या माझ्या सर्व पोलीस अधिकारी वृंद तसेच ग्रामस्थांचे त्रिवार आभार आणि ईश्वर त्यांची हिम्मत पावलो पावली वाढओ आणि या सर्वांच्या परिवाराला भरभरून आशीर्वाद देओ हीच प्रार्थना..