यवतमाळ (प्रतिनिधी) : पर्यावरण रक्षण ही आज काळाची गरज झाली असुन प्लास्टीकमुक्ती उपक्रम हे कार्यक्रमापुरते सिमीत न राहता ही लोकचळवळ झाली पाहीजे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी यवतमाळकरांना केले. नगर परिषद, प्रयास यवतमाळ आणि यवतमाळ प्लॉगर यांचे संयुक्त विद्यमाने प्लास्टीक बॅग निर्मुलन दिनानिमीत्ताने आयोजीत इको ब्रिक्स स्पर्धच्या बक्षिस वितरण समारंभाचे उद्घाटक तथा मुख्त अतिथी म्हणुन ते बोलत होते.
रविवारी नगर भवन येथे झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचेसह तहसिलदार कुणाल झाल्टे, ठाणेदार मनोज केदारे, प्रयासचे प्रशांत बनगिनवार, आयोजन समन्वयक अश्विन सवालाखे, यवतमाळ प्लॉगरचे भुषण क्षीरसागर, इनरव्हील क्लबच्या आरती मुक्कावार यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री येडगे पुढे म्हणाले कि, इको ब्रिक्स स्पर्धेच्या माध्यमातुन शाळा, कॉलेजच्या माध्यमातुन हजारो घरादारापर्यत पोहोचलेल्या परिषदेने आणि संस्थांनी ही मोहीम व्यापक करित प्लास्टीकमुक्तीचा संकल्प घेत हे सत्कार्य केले पाहीजे. या पर्यावरणपुरक उपक्रमास प्रशासनाच्या माध्यमातुन पाहीजे ती सर्व मदत करण्याचे आश्वासन आयोजकांना दिले. तहसिलदार श्री कुणाल झाल्टे आणि ठाणेदार श्री मनोद केदारे यांनी आपल्या भाषणातुन नगर परिषदेच्या कार्याचे व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करित हे मिशन प्रत्येक वार्डात राबवीण्याचे सुचविले. प्लॉगरचे चैतन्य घुमे आणि प्रयासचे प्रशांत बनगिनवार यांनी आयोजनाची भुमिका मांडत यादरम्यान आलेले अनुभव विषद केले.
या स्पर्धेमध्ये सर्वाधिक इको ब्रिक्स बनविल्याबद्दल स्कुल आफ स्कॉलर्सला प्रथम, वायपीएस शाळेला द्वीतीय, इनरव्हील क्लबला तृतीय तर डॉ वृशाली माने यांना चतुर्थ पुरस्कार प्राप्त झाला. स्पर्धेत नोंदणी करुन ब्रिक्स तयार केलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्प, रोख बक्षिस आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करुन गौरवीण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल वासनीक यांनी केले. आयोजनाकरिता प्रयासचे डॉ विजय कावलकर, सुदेश कापर्ती, प्रशांत बनगिनवार, सुधाताई पटेल, विद्याताई नरहरशेट्टीवार, डॉ विजया कावलकर, प्राची बनगिनवार, वसंत उपगनलावार, हेमंत कोषटवार, दत्ताभाऊ कुळकर्णी, महेंद्र गुल्हाने, प्रशांत गोडे, अभीजीत गुल्हाने, अमोघ व्होरा, मुकेश पटवा, डॉ चेतन दरणे, अंकुश पाटील, महेश नालमवार, उद्य सज्जनवार आदी प्रयासींसह यवतमाळ प्लॉगरचे ऋषीकेश कंगाले, यामिनी घरत, कार्तीक वानखेडे, कौशल वानखेडे, गौरव पाढेन, तेजस गावंडे, रोहीत रहांगडाले, अनिकेत तुरख़डे, अल्केश अंभोरे, महिमा कोषटवार, धनश्री कोल्हे, मयुरी घरत, कैवल्य पाटील आदींनी सहकार्य केले. —————- चौकट पावसातही केले प्लास्टीक निर्मुलन शहरातील ५० पेक्षा जास्त शाळा, कॉलेज, संस्थांचे प्रतिनिधी, स्पर्धा परिक्षा क्लासेसचे विद्यार्थी अशा दिड हजारावर सर्व वयोगटातील यवतमाळकरांनी स्वयंस्फुर्तपणे प्लास्टीक निर्मुलन अभियान राबविले. पाऊस सुरु असतांनाही शहरातील मध्यवर्ती भागात हे प्लास्टीकमुक्ती अभियान सुरु होते. ————– चौकट दिड हजार विद्यार्थी, ५ हजार ब्रिक्स इको ब्रिक्स स्पर्धेत ५ हजारपेक्षा जास्त ईको ब्रिक्स तयार झाल्या. शहरातील ५० पेक्षा जास्त शाळा, कॉलेज तसेच संस्थांचे सदस्य व स्पर्धा परिक्षांचे विद्यार्थी अशा एकुण दिड हजार विद्यार्थ्यांनी ईको ब्रिक्सचे प्रशिक्षणही प्रयासी आणि प्लॉगर्स तर्फे घेतले. तसेच नगर परिषद वाहनतळ येथे संकलनातुन हजारपेक्षा जास्त प्लास्टीक बॉटल्स आणि २५० पेक्षा जास्त बॅग प्लास्टीकचा कचरा संकलित करण्यात आला होता. —————– चौकट प्लास्टीकमुक्ती चा निनाद… या अभियानानिमीत्ताने जनजागृती समिती, माजी सैनिक संघटना व पार्वती आटोमोबाईल तर्फे शहरातील मुख्य रस्त्यांवरुन जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीतील भारत माता की जय आणि प्लास्टीकमुक्तीच्या जयघोषाने परिसर निनादला होता. यावेळी समितीचे राजु निवल, विनोद आरेवार, पंडीतराव पवार यांची उपस्थिती होती.