Home यवतमाळ न्यू इंग्लिश हायस्कूल , राळेगाव यांची एस. एस. सी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट...

न्यू इंग्लिश हायस्कूल , राळेगाव यांची एस. एस. सी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

138

 

राळेगाव तालुका प्रतिनिधी :– आज दिनांक 17 जून रोजी एस .एस. सी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राळेगाव येथील नामांकित न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,मधून एस. एस. सी. बोर्ड परीक्षेला एकूण 314 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.त्यापैकी 300 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी 95.54 % असून शाळेमधून प्रथम क्रमांक कु. श्वेता चंद्रमणी भगत 93.20 टक्के मिळाले

कु. स्वेता भगत

असून द्वितीय क्रमांक कु. पल्लवी गजानन सोनुले 93.0% गुण मिळवून प्राप्त केला असून तृतीय क्रमांक कु जुली खुशाल सोनेकर 92.40% हिने गुण मिळविले आहे एकंदरीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुद्धा 10 वी च्या बोर्ड परीक्षा निकालात मुलीनेच बाजी मारली असून शाळेत प्राविण्य श्रेणीत 84 तर प्रथम श्रेणीत 144 विद्यार्थी पास झाले

कु. पल्लवी सोनुले

असून द्वितीय श्रेणीत 65 विद्यार्थी पास झाले असून तर तृतीय श्रेणीत 7 विद्यार्थी पास झाले असून शाळेच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा परिसर पाहता 10 वी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवली असून त्यामुळे विध्यार्थीचा प्रवेश मिळविण्यासाठी पालकाचा कल शाळेकडे वाढला असून मागील सत्रात चालत शाळेत चालत असलेल्या सराव परीक्षा,ईतर शालेय उपक्रम यासाठी महत्वाचे आहे. या निकालाचे, न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष बी. के. धर्मे, सचिव सौं. अर्चना धर्मे तसेच प्राचार्य मोहन देशमुख, उपप्राचार्य प्रा. जितेंद्र जवादे, पर्यवेक्षक विजय कचरे तसेच संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून शाळेतील 10 बोर्ड परीक्षेच्या उत्कृष्ट निकाला बाबतीत समाजातील सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.