Home यवतमाळ शहरात प्रथमच लोक सहभागातून शहरातील मोकाट श्वानानाचे जागोजागी जाऊन रेबीज लसीकरण होणार.

शहरात प्रथमच लोक सहभागातून शहरातील मोकाट श्वानानाचे जागोजागी जाऊन रेबीज लसीकरण होणार.

180

 

यवतमाळ – मागील ३ महिन्या आधी यवतमाळ शहरात मोकाट कुत्र्यांवर खरूज हा रोग आला होता. खरूज हा आजार मानवी जवणाला सुध्दा होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन ओलावा पशु प्रेमी संस्थेने यवतमाळ शहरातील १४०० पेक्षा जास्त कुत्र्यांना खरूज हा आजार भविष्यात होणार या करता औषधी दिल्यात , त्याच वेळी ओलावा संस्थेने यवतमाळ शहरातील प्रत्येक परिसराचा आढावा घेऊन कोणत्या परिसरात किती कुत्रे आहेत ते कशा प्रकारे आहेत या सर्व गोष्टी अभ्यसल्या. एक ते दीड महिन्या पूर्वी उमरसरा परिसरातील एका पोरला कुत्रा चावल्याने रेबीज होऊन मृत्यु झाला. रेबीज हा आजार पावसाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात कुत्र्यांना होतो आणि हा आजार झाल्यास याचा कुठेही इलाज नाही. ही बाब ओलावा पशु प्रेमी संस्थेने लक्षात घेऊन यवतमाळ शहरातील प्रत्येक परिसरात जाऊन मोकाट कुत्रे पकडुन त्यांच्या रेबीज लसीकरणाची मोहीम ओलावा पशु प्रेमी संस्थेने हाती घेतली आहे. आतापर्यंत १५० पेक्षा अधिक मोकाट कुत्र्यांना वेगवेगळ्या परिसरात जाऊन लसीकरण देण्यात आले आहे.

यात डॉ.बी.बी चव्हाण, डॉ के.वी बनसोड, सुमेध कापसे,मयंक अहिर,पवन दाभेकर,चेतन बोरकर, बादल कंडारे,श्वेता चंदनखेडे,सचिन काकडे,आशय नंदनवार,भूषण घोडके, कपिल तेकाम, निलेश पेंडले, सुमित पेण्दोर, राजश्री ठाकरे,प्रज्वल गणवीर,अखिल चुकुलवर,प्रतीक धाडोरे,अनुराग जाधव,राहुल माहाडोळे,कृष्णा गंभीरे.

आपणास एक विनंती आहे यवताळमधील बहुतांश परिसरातील काही लोक मोकाट कुत्र्यांना खायला देतात आणि ती मोकाट कुत्रे त्याच्या बोलवण्याने येतात जर आपल्या पैकी कोणी असे खायला देतअसेल किंवा आपल्या परिचयातील ज्या पण व्यक्तीकडे मोकाट कुत्रे आवाज दिल्यास येत असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबर संवाद साधावा ज्याने करून आपल्या परिसरातील मोकाट कुत्र्यानचे रेबीज लसीकरण लवकरात लवकर होईल. मो. नं-७५५८३४९०१९