Home विदर्भ भातकुली तहसील चे कामकाज राम भरोसे…

भातकुली तहसील चे कामकाज राम भरोसे…

502

 

Amravati- ( प्रतिनिधी -: धनराज खर्चान.) – 3 वर्षा आधी भातकुली तहसील चे मुख्य कार्यालय हे भातकुली येथे हलवन्यात आले तेव्हा पासून ते आज पर्यत तहसील कार्यालय हे शोभेची वास्तु आहे की काय हे दिसत आहे .जिल्हा अधिकारी मॅडम याना निवेदन देऊन भातकुली येथील मा. तहसिलदार मॅडम ह्या आठवड्यातून एक किवा दोन दिवस येतात व आल्या की 2 ते 3 तासात निघुन जातात व पूर्ण कारभार अमरावती येथून पाहतात.

कमी कर्मचारी वर्ग 3 नायब तहसीदार असने गरजेचे असतांना फक्त एक नायब तहसीदार आहे. , तहसीदार मॅडम यांची गैर हजेरी मनमानी कारभारा 2 वर्षा आधी संजय गांधी निराधारा योजनेतील मंजूर प्रकरण असलेल्या नागरिकांना अजुन पर्यत लाभ नाही यांचे पैसे गेले कुठे याची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी भाजपा चे ओबीसी मोर्चा अध्यक्ष सोपान गुडधे यांनी जिल्हाधिकारी यांना असे निवेदन दिले, सर्व पाहत असतांना नागरिकांना होणारा प्रचंड त्रास अश्या परिस्थिति मधे नागरिकांनी आपल्या कामा साठी जायच कोणा कड़े असा पडला आहे .? की भातकुली तहसील चे कामकाज हा राम भरोसे आहे .

आपन ह्या विषयाला गाभीर्याने घेऊन ही परिस्थिति लवकर सुव्यवस्थित करावी ,निवासी नायब तहसीदार व संजय गांधी योजनेचे नायब तहसीदार यांना लवकरात लवकर नियुक्त करावे व जिल्हाधिकारी यांनी स्वतःहा तहसील कार्यालयास भेट देऊन आढावा घ्यावा जर ह्या प्रकरणी जिल्हा अधिकारी यानी दखल घेतली नाही तर मोठे आंदोलन उभारु..असा ठोसक इशारा सुद्धा देण्यात आला.यावेळी सोपान गुडधे जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा अमरावती जिल्हा.माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना तसेच भातकुली तालुका भाजपा अध्यक्ष विकास देशमुख उपस्थित होते.