Home यवतमाळ पर्यावरण संरक्षण कार्यशाळा ५ जून रोजी

पर्यावरण संरक्षण कार्यशाळा ५ जून रोजी

256

 

नगर परिषद यवतमाळ व पर्यावरण संरक्षण समिती व जेष्ठ
नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ जून २०२२
रोजी दुपारी ३.३० वाजता जेष्ठ नागरिक भवन बालाजी सोसायटी यवतमाळ येथे पर्यावरण संरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या पर्यावरण संरक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी
अमोल येडगे यांचें हस्ते होणार आहे. यावेळी पर्यावरण विषयांवर विशेष अतिथी मार्गदर्शन करणार आहेत. यात मदत फाऊंडेशन आर्वीचे अध्यक्ष अनील जोशी हे संस्था व्यवस्थापन व नाविन्यपूर्ण उपक्रम या विषयावर तर वैद्यकीय जनजागृती मंच वर्धाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे हे रेनवॉटर हार्वेस्टींग व वृक्ष संगोपन मोहीमेवर, अजिंक्य कोट्टावार हे प्लास्टीक फ्री मोहिमेचे नवे पर्यावरण पुरक मोड्यूल सिएसआर फंड या विषयावर तर जेष्ठ समाजसेविका करिश्माजी गालानी ह्या मोकाट जनावरांच्या सेवा संगोपनातील संधी समस्या कायदे व जनजागृती या विषयावरती मार्गदर्शन करणार आहे.
तत्पूर्वी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या हस्ते प्रयासवन येथे सकाळी ७.३० वाजता सीड बाॅल प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पर्यावरण प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगर परिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी, बळवंत चिंतावार आणि कार्यशाळा संयोजक अश्विन सवालाखे यांनी केले आहे.