Home भंडारा शिवशाही फाऊंडेशन ,भारत तर्फे महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले

शिवशाही फाऊंडेशन ,भारत तर्फे महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले

224

 

आरोग्य शिबीर व त्यामध्ये करोना रोगाबद्दल जनजागृती करण्यात आले. महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील 500 कोरोना योद्धाचा सत्कार व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.तसेच 2000 मास्क वाटप करण्यात आले.

तसेच शिवशाही स्पर्धा केंद्राकडून UPSC/MPSC व पोलीस भरती चे मोफत मार्गदर्शन व शिबिर घेण्यात आले यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. गरजू व होतकरू स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे 200 विद्यार्थ्यांना मोफत नोट्स व पुस्तक व ई बुक उपलब्ध करून दिली.. मोफत कादंबरी व आत्मचरित्र हजारो वाचकांना ई बुक मध्ये उपलब्ध करून दिली. विविध जिल्ह्यात ‘स्कूल चले हम’ या अभियान अंतर्गत दुर्गम व डोंगराळ, झोपडपट्टी भागात शैक्षणिक साहित्य वाटप व करोना जनजागृती व मास्क, सॅनिटायझर 260 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

मोफत विविध प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी संस्थाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर, उपाध्यक्ष प्रशांत चव्हाण व सहदेव जाधव, खजिनदार प्रतिक कोडूलकर,सचिव योगेश पाटील , कार्यक्रम प्रमूख पंकज मस्कर , विनोद पात्रे,विजय मोरे,अतुल देशमुख, विशाल भानुसे, संगीता खटोल, तुकाराम माडकर,सचिन पाटील, ऋतुराज पाटील, विराज पाटील ,अमित शिंदे,संकल्प सपकाळ,कैलास दुभळकर,संदिप सुतार इतर सर्व जिल्हा प्रमूख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.या सामाजिक कार्यात सौरभ बनौधा,डाॅ.नवज्योत शर्मा, डाॅ.नकुल कोरडे,संदिप मिस्त्री, सारंग कुलकर्णी याचे मोलाचे योगदान दिले.