
जिल्हा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख यांचे आवाहन

यवतमाळ – जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिका निवडणूक येत्या काळात होऊ घातल्या आहेत.ह्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख यांनी नुकताच यवतमाळ जिल्हाचा झंझावाती दौरा केला.सातही विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांनी विधानसभा पातळीवर जाऊन चर्चा केली व गटतट व हेवेदावे दूर सारून शिवसेनेचा एकहाती भगवा स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवण्याचे लक्ष ठेऊन पुढे कार्य करण्याचे त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना आवाहन केले.
शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आदेशाने यवतमाळ जिल्ह्यात ” हम होंगे कमियाब” हे मिशन राबवण्याचे आदेश त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांना दिले.शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी गेल्या अडीच वर्षात घेतलेले चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवावे व जनतेचे व तळागाळातील गरजूंचे प्रश्न सोडवण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करावा.दिग्रस-दारव्हा-नेर मतदार संघात माजी मंत्री व आमदार संजय राठोड यांचे नेतृत्वात जी बांधणी झाली आहे तशी बांधणी जिल्ह्यात सर्वत्र करावी असे श्री मधुकर देशमुख ह्यांनी सांगितले.शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे भागातील स्थानिक विकासात्मक कामांचे प्रश्न व जिल्हा विषय समित्यांचा रखडलेला प्रश्न जिल्हा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख ह्यांचे कडे मांडला.त्याबद्दल लवकरच तोडगा काढला जाईल असे त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना आश्वस्थ केले.
“धर्मवीर” ह्या चित्रपटातून पक्ष निष्ठा आपण शिकली पाहिजे.गद्दारांना शिवसेनेत क्षमा नाही असे देखील त्यांनी सांगितले.शिवसेनेला व पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना,महाविकास आघाडी सरकारला बदनाम करणाऱ्यांना वेळीच चोख उत्तर द्या असे देखील आवाहन त्यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांना केले. जिल्ह्या दौऱ्यात वणी विधानसभा,आर्णी विधानसभा,उमरखेड विधानसभा,पुसद विधानसभा,दिग्रस विधानसभा,राळेगाव विधानसभा व यवतमाळ विधानसभेत पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या.दौऱ्यात शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर,जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड व जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, महिला आघाडी जिल्हा पदाधिकारी सौ सागरताई पुरी,सौ निर्मलाताई विनकरे,सौ मंदाताई गाडेकर,जिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा, विशाल पांडे,विक्रांत चचडा,डॉ प्रसन्न रंगारी हे प्रामुख्याने उपस्थित होते.विधानसभा बैठकांमध्ये शिवसेना आजी माजी लोकप्रतिनिधी,शिवसेना विभाग प्रमुख,उपतालुका प्रमुख,तालुका प्रमुख,उपजिल्हा प्रमुख,शहर प्रमुख,शहर पदाधिकारी युवासेना व महिला आघाडीचे तसेच शिवसेना प्रणित संघटनांचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.











































