Home विदर्भ झाडगांव येथे बुध्दमुर्तीचे अनावरण

झाडगांव येथे बुध्दमुर्तीचे अनावरण

209

बाबाराव इंगोले,झाडगांव
तालूका प्रतिनिधी,धामणगांव रेल्वे:-धामणगांव रेल्वे तालूक्यातीत झाडगांव येथे बुध्दमुर्तीचे अनावरण वैशाखी पोर्णिमेला संपन्न झाले.
बुध्दपोर्णिमेच्या दिनी कालकथित लक्ष्मीबाई शिंगणापूरे यांच्या स्मृती दिनानिमित्य बुध्दपोर्णिमेच्या दिवशी त्यांचे सुपूञ विनोद उर्फ बंटी शिंगणापूरे यांनी आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ बुध्दमुर्तीचे प्राणप्रतिष्ठा करुण वडील मा.प्रभाकर शिंगणापूरे यांचे हस्ते बुध्दपोर्णिमेच्या दिवशी अनावरण करण्यात आले व कालकथित लक्ष्मीबाई शिंगणापूरे यांना सहकुंटूंब सहपरीवाराने परीवारातील सदस्यांनी व उपासक उपासिकांनी बुध्दवंदना ग्रहण करून लक्ष्मीबाई शिंगणापूरेच्या स्मृतीस आदराजंली दिली. यावेळी फळ,अल्पहार व खिर दान करण्यात आले.