Home मुंबई बहुजन हृदय सम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना राज्यसभेवर उमेदवारी मिळावी. :- डॉ. राजन...

बहुजन हृदय सम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना राज्यसभेवर उमेदवारी मिळावी. :- डॉ. राजन माकणीकर

166

 

मुंबई दि (प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या पक्ष प्रमुखांनी राज्यसभेच्या उमेदवारी करिता बहुजन ह्रदय सम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना विचारात घेणे महत्वाचे आहे असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

पॅन्थर डॉ. राजन माकणीकर पुढे म्हणाले की, आजच्या परिस्तिथीत आरएसएस प्रणित भाजपा सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन मताचे राजकारण करत आहे. सेना काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी तर आधीच सत्तेसाठी वापर केला आहे.

संबंध देशासह राज्याच्या राजकारणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केल्याशिवाय राजकीय पक्षांची पोळी भाजत नाही मग त्यांच्या रक्तांचे वंशज राज्यसभेवर का चालत नाहीत? हा जातीवाद नव्हे काय?

आंबेडकरी अनुयायी भावनिक असल्यामुळे फक्त मतांसाठी वापर करणे सत्ताधारी व विरोधी पक्षांनी सोडावे. कारण तुमची वैचारिक प्रगल्भता यामुळे दिसून येते. स्वतःला सिद्ध करायचे असेल तर डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे खरे वारसदार ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना सामावून घेण्याचा सल्ला यावेळी डॉ. माकणीकर यांनी दिला.