Home मुंबई छत्रपती संभाजी राजे भोसलेंनी बौद्ध धम्माची दिक्षा घ्यावी – डॉ. राजन माकणीकर

छत्रपती संभाजी राजे भोसलेंनी बौद्ध धम्माची दिक्षा घ्यावी – डॉ. राजन माकणीकर

157

 

मुंबई , दि  11 (प्रतिनिधी) – राजश्री शाहू महाराजांच्या वंशजांना ब्राह्मणी व्यवस्था मंदिरात प्रवेश नाकारत आहे अशी व्यवस्था झुगारून छ. संभाजी राजे भोसले यांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचे आमंत्रण भारतीय बौद्ध महासभेचे माजी केंद्रीय शिक्षक व माजी श्रामनेर डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिले.

राजश्री शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृतिदिना निमित्ताने संबंध भारताने अभिवादन केले असून बहुजनांच्या हक्कासाठी समानतेचे दरवाजे उघडणाऱ्या वंशजांना मंदिर प्रवेश नाकारणे म्हणजे संविधानाची पायमल्ली करून मनुस्मृती ची अंमलबजावणी करणे होय.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचा राष्ट्रीय महासचिव या नात्याने मंदिर प्रवेश नाकारणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करून त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहे असेही ते म्हणाले.

मनुस्मृतीचे कायदे पाळण्यात येत असून अश्या दांभीक प्रवृत्तीना थांबवण्यासाठी बुद्ध धम्माची अत्यंत गरज आहे, छ. संभाजी राजेंनी धम्माकडे पावले वळवले तर देशात आमुलाग्र बदल घडेल.
छ. संभाजी भोसले यांनी आमंत्रण स्वीकारले तर आंतरराष्ट्रीय पूज्य भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो व पूज्य भन्ते शिलबोधी (गडकिल्ले लेणी संवर्धक) यांच्या हस्ते दिक्षा देण्याचा कार्यक्रम आखू असे मत ही डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केले.