
पोलीस मिञ परीवार समनवय समितीचा उपक्रम…!
बाबाराव इंगोले:-धामणगांव रेल्वे:
अमरावती – धामणगांव रेल्वे तालूक्यातील झाडगांव येथे “महात्मा ज्योतिबा फुले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्या महापूरूषांच्या संयूक्त जयंती कार्यक्रम पोलीस मिञ परीवार समन्वय समिती व श्री गुरूदेव सेवा मंडळच्या विद्यमाने दि.12मे सांय.वेळ6:00वाजता श्री गुरूदेव सेवाश्रम येथे साजरा होत आहे त्यानिमित्याने गरीब गरजू विधवा महिलांना शिलाई मशिनचे मोफत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
“अश्रूनां जर पंख जरा से,लावून घेता आले असते.
या डोळातून त्या डोळांना, झरकन देता आले असते.
ह्या ह्रदयाच्या जख्मा जर का,त्या ह्रदयाला कळल्या असत्या.
माणूसकीला उंचीवरती,सहजचं नेता आले असते.
जळणाऱ्याला विस्तवं कळतो,बघणाऱ्याला नाही.
जगणाऱ्याला जीवन कळते,पळणाऱ्याला नाही.”या विचाराची जाण ठेवून पोलीस मिञ परीवार समन्वय समिती सतत चार वर्षापासून गरीब गरजू अपंग,विधवा महिलांच्या कुंटूंबातील हाल अपेष्टा पाहून समाजातील गरजू महिलांना मोफत शिलाई मशिन देवून त्याच्यां कुंटूंबाला स्वाभिमानाने जीवन जगण्याचे सामर्थ्य देत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.संघपाल उमरे,संस्थापक अध्यक्ष पोलीस मिञ परीवार समन्वय समिती महा.राज्य तर उद़्घाटक मा.सुरज तेलगोटे,सहा.पोलीस निरीक्षक मंगरूळ दस्तगीर,कार्यक्रमाचे मुख्यमार्गदर्शक मा.विजय वानखडे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र बार्टी अधिकारी अमरावती यावेळी प्रमुख पाहूणे मा.विनोदभाऊ पञे सचिव पोलीस मिञ परीवार समन्वय समिती महा.राज्य,मा.सुभाषजी सोळंके मुख्य सल्लागार पो.स.मि.प.समन्वय समिती महा.राज्य,मा.मनिष गुडद्धे अमरावती जिल्हा विभागीय प्रमुख,मा.कैलाश विंचूरकर अमरावती जिल्हाध्यक्ष,मा.राजेंद्र तांबेकर अमरावती जिल्हा महासचिव पोलस मिञ परीवार समन्वय समिती,मा.अॅड.नाझी पठाण सामाजिक कार्यकर्ता,मा.रविभाऊ ठाकरे, मा.शैलेशजी जयस्वाल,मा.नामदेवराव बमनोटे,मा.घनश्यामजी भिमटे सामाजिक कार्यकर्ता यांचे प्रमूख उपस्थितीत गरीब गरजू विधवा महिलांना शिलाई मशिनचे मोफत वाटप व समाजासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.










































