
रावेर ( शेख शरीफ)
रावेर येथील फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचे विद्यमाने दिनांक ०८/०५/२०२२ रोजी रावेर येथील सरदार जी जी हायस्कूल येथे बौद्ध समाजाचा दहा वा सामुहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र जाधव गुरुजी हे होते तर उद्घाटक दिपरत्न तायडे हे होते या कार्यक्रमाला विषेश उपस्थीती रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी श्रीराम इरीगेशन चे अध्यक्ष श्रीराम पाटील पद्माकर महाजन दिपक पाटील भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस सुमंगल अहीरे ऐ.टी.सुरडकर एस पी जोहरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तथागत भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जिल्ह्यात धार्मिक व सामाजिक कार्य गतीमान केल्याबद्दल रावेर तालुक्यातील बौद्ध समाज्याच्या वतीने व फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रावेर यांनी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक केंद्रीय शिक्षक विजय शामराव अवसरमल यांना धम्मरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील रावेर नगरपरिषद चे उपनगराध्यक्ष रंजनाताई गजरे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजु भाऊ सुर्यवंशी मा.नगरसेवक जगदिश घेटे उद्योजक दिपरत्न तायडे राजु घेटे दैनिक लोकशाही चे उपसंपादक दिपक नगरे फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.











































