Home विदर्भ भारत बंदला पातूर येथे हिंसक वळण दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यां सह महिला प्रवासी...

भारत बंदला पातूर येथे हिंसक वळण दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यां सह महिला प्रवासी जखमी…

58
0

पोलिसांचा लाठीचार्ज…

अमीन शाह

अकोला , दि. २९ :- मोदी सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) देशभरात कडाडून विरोध होत आहे. हजारो नागरिक रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत अकोला जिल्हा पातूर येथे भारत बंद दरम्यान पातूर पोलीस स्टेशन सोमर रास्ता रोको करण्यात आल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या तीन तास उलटून ही आंदोलन करते न हटल्यामुळे पोलिसांना सौम्य प्रमाणात लाठी चार्ज करावा लागला या वेळी जमाव हिंसक होऊन जमावाने बसेस तसेच परिसरातील काही दुकानांवर दगड फेक केली या दगड फेकीत चार ते पाच महिला प्रवासी तसेच दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले तर काही बसेस व दुकांच्या कचा देखील फोडण्यात आल्या मुळे पोलिसांना संतप्त जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला आहे.

या संपूर्ण घटने मुळे सरकारी तसेच व्यावसायिकांचे बरेच नुकसान झाले आहे. पातूर मध्ये सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पातूर येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त असून परिस्तिथी नियंत्रनात आहे तसेच कोणत्याही अफवान बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून पोलिस लक्ष ठेऊन आहेत.