Home महत्वाची बातमी 10 वी पास खा. सुधाकर श्रुंगारे डॉ. कसे? पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

10 वी पास खा. सुधाकर श्रुंगारे डॉ. कसे? पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

222

 

(माजी मुख्यमंत्री फडणवीसांकडे डिग्री वाटपाचे खाते आहे का?)

मुंबई , (प्रतिनिधी) –  10 वी पास लातूर चे खासदार सुधाकर श्रुंगारे हे डॉ. कसे? माजी मंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रुंगारे यांना चक्क डॉ. संबोधून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, दहावी शिकलेल्या व्यक्तीस डॉ. म्हणणाऱ्या कृतिचा जाहीर निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. पॅन्थर राजन माकणीकर् यांनी केला आहे.

विद्रोही पत्रकार माकणीकर पुढे म्हणाले की, लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर श्रुंगारे यांच्या जन्मदिना निमित्ताने महाराष्ट्राचे विरोधी नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी वोद्यमान खासदारांना शुभेच्छा देताना पुन्हा तीच चूक केली जी चूक तिकीट वाटपाच्या यादी मध्ये केली “डॉ” सुधाकर श्रुंगारे असा उल्लेख केला.
स्मरणार्थ या ट्विट मुळे भाजप पक्षात डॉ. सुनील गायकवाड नावाचा अजून विसर देवेंद्र फडणवीस यांना झाला नाही की काय? का डिग्री वाटपा चे विद्यापीठ सुरु केले आहे असा टोलाही फडणवीसांना यावेळी पॅन्थर माकणीकर यांनी लगावला.

आंबेडकर पुतळा संबंधी (नव्हे विडंबन) भाषणात खा. शृंगारे म्हणाले होते की, मला कोणी विचारत नाही, कार्यक्रमात बोलावत नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जशी शासन प्रशासन वा समाजात् पत कमी झाली तशीच भाजपात पण कमी होऊन माझी खासदारा डॉ. सुनील गायकवाड यांच्या आठवणीनां वारंवार विरोधी पक्ष नेत्याकडून उजाळा येतोय की काय असा मिश्किल टोला ही माकणीकर यांनी लगावला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका जवाबदार पदावर असून वारंवार तीच चुक करणे शोभा देत नाही, की जाणूनबुजून अस वर्तन करून वेगळेच संकेत देत आहेत यावर पक्षांतर्गत विचार करावा. मात्र अशी घोड चुक करून मतदार राजांना संभ्रमात पाडू नये असा इशारही यावेळी डॉ. माकणीकर यांनी दिला.