Home यवतमाळ यवतमाळ मनसैनिक पोलीसाच्या ताब्यात…!

यवतमाळ मनसैनिक पोलीसाच्या ताब्यात…!

949

यवतमाळ – राज्यात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. मशीदी वरील लाऊड स्पीकर वर अजान दिली जात असल्याने त्याविरुध्द हनुमान चालीसा वाजविण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यवतमाळ येथे मनसे पदाधिकारी देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्यासह अनेक मनसे पदाधिका-यांना स्थानबध्द करण्यात आले आहे.

या व्यतिरीक्त मनसे चे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांना सुध्दा पोलिसांनी नजर कैदेत ठेवले आहे. यवतमाळ जिल्यात कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस विभाग सतर्क आहे. मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे. तसेच अनेकांना नोटीस देऊन शांतता पाळण्याचे आदेश दिले जात आहे. सध्या तरी जिल्हयात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. विशेष म्हणजे मुस्लीम बांधवांनी सुध्दा अनेक मशीदी मध्ये लाऊड स्पीकर शिवाय अथवा कमी डेसीबल मध्ये अजान दिल्याने समाजात स्वागत केले जात आहे.