Home बुलडाणा वोह” आज भोंगे हटाने की बात कर रहे है कल मस्जिद गिराने...

वोह” आज भोंगे हटाने की बात कर रहे है कल मस्जिद गिराने की बात करेंगे!आमदार संजय गायकवाड

348

 

 

बुलडाणा ,

पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधवाकडून भर उनहाळ्यात उपवास केल्या जात आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने बुलडाणा येथील जामा मस्जिदच्या प्रांगणात आयोजित इफ्तार पार्टीत बुलडाणा आमदार संजय गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संबोधित करताना ते म्हणाले की, काही पक्षी मुस्लिम समाजाला , टार्गेट करत देशात शांती भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांनी CA, NRC, मग तलाकचा कायदा आणला व आता हिजाबचा मुद्दा उचलून धरला आहे उद्या बुरख्यावर बंदीसाठी ते ओरडणार,आज भोंगे हटाने की बात कर रहे है कल मस्जिद गिराने की बात करेंगे,, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, राज्यात दंगली घडवून राष्ट्रपती राजवट लागू करून या सरकारला हटविण्याचे त्यांचे प्लानिंग आहे, परंतु तुम्ही आम्ही त्यांच्या या प्रयत्नांना हानून पाडु, असे प्रतिपादन बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांनी 20 एप्रिल रोजी बुलडाणा येथे आयोजित इफ्तार पार्टिच्या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना केले आहे. तसेच मुस्लिम समाजाला शांततेत राहण्याचे देखील आवाहन त्यांनी केले. जातीय सलोखासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यात शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर,जामा मस्जिद इमाम हाफिज रहेमत, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे सुद्धा उपस्थित होते.