Home नांदेड सारखणी येथे सिंदखेड पोलिसांची नाका बंदी ; ८० दुचाकींची तपासणी.

सारखणी येथे सिंदखेड पोलिसांची नाका बंदी ; ८० दुचाकींची तपासणी.

1036

 

प्रतिनिधी : मजहर शेख,

नांदेड/सारखणी,दि,१८ :- सिंदखेड पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या सारखणी येथे मुख्य रस्त्यावर वसंतराव नाईक चौकात नाका बंदी करून दुचाकी गाड्यांची कागदपत्र तपासणी करण्यात आली.दिनांक १८ रोजी नांदेडचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशाने सिंदखेड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी सिंदखेड पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या सारखणी येथे सायंकाळी सात वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत सारखणी येथे मुख्य रस्त्यावर वसंतराव नाईक चौकात नाका बंदी करून दुचाकी गाड्यांची कागदपत्र,वाहन चालवण्याचा परवाना,विना नंबर प्लेट अश्या गाड्यांची तपासणी करून दंड आकारण्यात आला.या नाका बंदी मध्ये ८० दुचाकी गाड्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके,यांच्यासह बिट जमादार पठाण,पो.हेड कॉन्स्टेबल सानप, फुलारी,शेंडे, मोकले याकामी उपस्थित होते.