Home यवतमाळ पारवा पोलीस ठाणे अंतर्गत सावळी (सदोबा) दुरक्षेत्र येथे सर्वधर्मीय संमेलन संपन्न..!

पारवा पोलीस ठाणे अंतर्गत सावळी (सदोबा) दुरक्षेत्र येथे सर्वधर्मीय संमेलन संपन्न..!

558

 

➡️ जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांची प्रमुख उपस्थिती.

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी – पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दूरक्षेत्र सावळी (सावळी) येथे, गुडीपाडवा, रमजान महिना, रमजान ईद, श्रीराम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुडफायडे, हनुमान जयंती या सारख्या धार्मिक सण उत्सवाचे पार्श्वभूमीवर जातीय सलोखा व सामंजस्य वृध्दींगत करण्यासाठी तसेच सामाजिक एकोपा व सौहार्दभाव टिकविण्यासाठी पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत दूरक्षेत्र असलेल्या सावळी (सदोबा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकांमध्ये सदभाव…. संवाद… सलोखा … या करिता “सर्वधर्मीय संमेलन” या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ (भा.पो.से) यांची उपस्थीती होती.
सर्व धर्मीय संमेलनाची सूरूवात सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील यांचे हस्ते पूष्पहार अर्पण करून झाली. सर्वधर्मीय संमेलनाला मुस्लीम मौलाना सिराज, बौद्ध धर्माचे धर्मगुरु प्रा. सुमेध बोधी भंतेजी, बंजारा धर्मगुरु कनिरामजी महाराज, हिंदू धर्म प्रतिनिधी धनसिंग राठोड, कृष्णदेव राठोड , गांव गांवातील पूजारी, संत यांची उपस्थीती होती. मौलाना सिराज यांनी मूस्लीम धर्मा विषयी मार्गदर्शन करतांना आपण सर्व एक आहोत. सावळी (सदोबा) हे गांव परिसराची शांती अशीच कायम ठेवणे करिता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. बौद्ध धर्माचे धर्मगुरु प्रा. सुमेध बोधी भंतेजी यांनी सुद्धा मानव जातीचे कल्याणाकरिता पंचशिल व प्रज्ञा, शिल व करूणा या बाबी दैनंदिन आचरणात आणाव्यात या करीता मार्गदर्शन केले. आणि बंजारा धर्मगुरु कनिरामजी महाराज यांनी उपस्थीती दर्शवून संमेलनाची शोभा वाढवली. धनसिंग राठोड यांनी हिंदू धर्माविषयी त्यांचे श्वास व शैली मधून सूंदर विवेचन केले.
सर्व धर्मीय संमेलनास प्रमूख मार्गदर्शक म्हणून पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, सर्वांना पोलीस विभागातर्फे जय हिंद करत उपस्थीत नागरिकांना अभिवादन केले. पोलीस विभागाकरिता सावळी (सदोबा) हा यवतमाळ जिल्ह्याच्या हृदयस्थानी आहे. एक शांत प्रिय सर्कल म्हणून जिल्हात या सर्कलची ओळख आहेत. या सर्कलचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण आपण सर्वांनी अंगीकारली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटनेचे माध्यमातून धर्म निरपेक्षता आपण सातत्याने जपली पाहीजे. पोलीस अधिक्षकांनी त्यांचे मार्गदर्शना मध्ये गूढी पाढवा पासून सूरू झालेले सर्व धर्मीय सण उत्सव शांततेत पार पाडत असल्याबाबत नागरिकांचे धन्यवाद मानले.
यवतमाळ जिल्हया मधील मागील कालावधीत निर्माण झालेले कायदा व सूव्यवस्थेचा प्रश्न व ताणतणाव हे नागरिकांचे सहकार्याने व्यवस्थित सोडवले आहे. या कामी सर्व धर्मीय संमेलनातून तरूणाईचे मनात सर्व धर्म समभाव वृद्धींगत होईल. याकडे दैनंदिन लक्ष देणेची गरज आहे असे, उद्गार पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी काढले. सर्व धर्मीय संमेलनास महिला वर्गाची विशेष उपस्थीती पाहून पोलीस अधिक्षकांनी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानून महिला व मूलींची सूरक्षा हा आमचा प्रमूख एजंडा राहीलेला आहे असे आश्वासित केले. जिल्हया मधील अवैध धंदे याचे कायमस्वरूपी उच्चाटन व्हावे या करिता नागरिकांचे देखील सहकार्य अपेक्षित आहे, अशी विनंती पाटील यांनी यावेळी केली.
या सर्वधर्मीय संमेलन कार्यक्रमाचे प्रस्ताविक पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी केले. आभार सावळी (सदोबा) दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील, लोकनेते बाळासाहेब शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश राठोड, धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रल्हाद पाटील जगताप, प्रल्हाद गावंडे, विजय राऊत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोनबा मंगाम, अहेमद खान, सावळी (सदोबा) माजी सरपंच अहेमद तंवर, राजु चव्हाण, नुनेश्वर आडे, मनोहर बहादे, वामन नाईक, शहीद पत्नी कुंन्तीताई आडे, अंजनाताई गेडाम, विजय भगत, सावळी (सदोबा) परिसरातील पोलीस पाटील संघटना, तंटामुक्त गांव समितीचे अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती तथा महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
➡️ अन पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी आपले भाषण मध्येच थांबविले…
पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांचे मार्गदर्शनपर भाषण सुरू असतांनाच मस्जीद मधिल‌ अजान‌ सुरू झाल्याचा आवाज येताच, पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी अजानचा मान राखत आपलं भाषण दोन मिनिटे थांबविलं. आणि अजान‌ सुरु होताच आपल्या भाषणाला पूर्ववत सुरूवात केली.
➡️ ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले…
तीस वर्षानंतर असा कर्तबगार व दबंग ठाणेदार पारवा पोलीस स्टेशन व आमच्या परिसराला दिल्यामुळे आम्ही अक्षरशा पोलीस विभागाचे ऋणी आहोत, असे उदगार या परिसरातील महिला भगिनींनी व सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी पोलीस अधीक्षक डाँ. दिलीप भुजबळ पाटील समोर व्यक्त करताच ठाणेदार विनोद चव्हाण यांच्याही लक्षात आले की, या भागातील सर्व सामान्य नागरिक व सर्व पक्षीय राजकीय नेते त्यांना किती चाहतात हे पाहून ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या डोळ्यात अक्षरशा आनंदाश्रू वाहले.