Home यवतमाळ न्यू इंग्लिश हायस्कूल पगारदार कर्मचारी सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाची अविरोध...

न्यू इंग्लिश हायस्कूल पगारदार कर्मचारी सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाची अविरोध निवड

141
0

 

अध्यक्ष पदी कु. रेखा कुमरे , उपाध्यक्ष पदी विनोद चिरडे तर सचिव पदी किशोर उईके यांची अविरोध निवड

विनोद चिरडे
किशोर उईके

राळेगाव :- राळेगाव येथील स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल पगारदार कर्मचारी सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाची नुकतीच नवीन कार्यकारणी संचालक मंडळाची अविरोध निवड करण्यात आली. यामध्ये संस्थेचे पदाधिकारी म्हणून अध्यक्ष पदी कु. रेखा कुमरे उपाध्यक्ष पदी विनोद चिरडे तर सचिव पदी किशोर उईके यांची नवीन संचालक मंडळातून अविरोध निवड करण्यात आली तर अविरोध संचालक म्हणून अरुण कामनापूरे,सुरेश कोवे,सुचित बेहरे , किशोर उईके,कु.रेखा कुमरे,गोपाल बुरले,विनोद चिरडे, नितीन जुनुनकर कु.जया ठवरी शैलेष वातीले, प्रवीण चौधरी,विनोद तायडे,प्रफुल्ल चांदेकर,निलेश उमरे, भास्कर लोंढे यांची संचालक म्हणून अविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून सौं. वर्षा चौधरी यांनी कामकाज पाहले. तर न्यू इंग्लिश हायस्कूल पगारदार कर्मचारी सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाची अविरोध निवड झाल्या बद्दल न्यू एज्युकेशन सोसायटी, संस्थेचे अध्यक्ष भाऊराव धर्मे, सचिव सौं अर्चना धर्मे, प्राचार्य मोहन देशमुख, उपप्राचार्य प्रा. जितेंद्र जवादे, पर्यवेक्षक विजय कचरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले असून नवनियुक्त पदाधिकारी व संचालक मंडळाचे निवडीचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे……

Previous articleमशिदींवरील भोंग्यांवर न्यायालयाचा आदेश का लागू नाही ?’ या विषयावर विशेष संवाद…!
Next articleधाडशी व्यक्मतीमत्व ट्रक ड्रायव्हर योगिता रघुवंशी
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.