रावेर (शेख शरीफ)
मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना मानला जातो . या महिन्यात सर्व मुस्लिम मंडळी रमजान चे उपवास म्हणजेच रोज़ा ठेवत असतात . परंतु इतक्या उन्हाळ्यात ४४ ते ४५ अंश तापमान असतांना उपवास पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा पूर्ण करून रावेरातील मदिना कॉलनी येथील रहिवासी ज़िकरा तंजिल शेख इमरान ( वय ६) तेरा रमजानचा रोज़ा आपल्या जीवनातला पहिला रोज़ा ठेवला . सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी ५ वाजेपासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अन्नाच्या एक कण आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून हिने ( अल्लाह ) ईश्वर प्रती आपली श्रद्धा व्यक्त केली . एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा पूर्ण केल्याबद्दल या चिमुकलीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . तो अलहसनात उर्दू प्राथमिक रावेर शाळेतील उप शिक्षक शेख इमरान शेख बाबु यांची मुलगी आहे.

