Home अकोला “पत्रकार संरक्षण समिती” ची मांगणी पत्रकाराला धमकी देणाऱ्या त्या पोलीस निरीक्षका वर...

“पत्रकार संरक्षण समिती” ची मांगणी पत्रकाराला धमकी देणाऱ्या त्या पोलीस निरीक्षका वर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा

369

 

अकोला /अकोट: राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अमलबजावणी झाल्यावर पण राज्यात पत्रकारांवर अत्याचार सुरूच आहे, अनेक अधिकारी आपल्या भ्रष्टाचार आणि ठाण्यापरिसरतील सर्रास सुरू अवैध धंद्याचे संरक्षण करण्यासाठी पत्रकारांची आवाज दाबण्यासाठी पत्रकारांना खोटे गुन्ह्यात अळकवण्याची धमक्या देतात.

व अत्याचार पन सुरूच आहे असच अकोला येथील इन्ग्रेजी वृत्तपत्राचे वरिष्ठ वार्ताहर तथा संपादक अवेज सिद्दीकी ह्यांनी अकोट फाइल परिसरातील सर्रास सुरू अवैध धंदे सम्बधीत बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित केल्या होत्या ज्याचा राग धरून अकोला येथील अकोट फाईल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांनी वृत्तांकन करून घरी परत असलेले पत्रकार अवेज सिद्दीकी ह्यांना अकोट फाईल उडान पुलावर अडवून अश्लील शिविगाड करत खोट्या गुन्ह्यात आळकविण्याची धमकी दिली। ह्या प्रकरणात ठाणेदार महेंद्र कदमवर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याकरीता आज दि 13 एप्रिल रोजी पत्रकारक संरक्षण समिती तर्फे अकोट तहसीलदार यांच्या मार्फत गृहराज्यमंत्री ह्यांना निवेदना देऊन गुन्हे दाखल करण्याची मांगणी करण्यात आली. निवेदन देते वेळी आदी उपस्थित होते.