Home मुंबई एस टी / एस सी अखिल भारतीय महासंघाच्या वतीने खाजगीकरणाबाबत हलबोल निदर्शने

एस टी / एस सी अखिल भारतीय महासंघाच्या वतीने खाजगीकरणाबाबत हलबोल निदर्शने

77
0

के . रवि (दादा )

मुंबई – एस टी ) एस सी ऑल इंडिया कॉन्फेडरेशनच्या वतीने खाजगीकरणावर हल्लाबोल निदर्शने संपूर्ण देशासहीत मुंबईत ही यशस्वी रित्या करण्यात आली. एससी, एसटी ऑल इंडिया कॉन्फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदित राज जी यांच्या निर्देशानुसार हे देशव्यापी निदर्शन करण्यात आले.


हे धरणे प्रदर्शन वांद्रे, मुंबई, महाराष्ट्र येथील जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयावर होते. महासंघाचे नेते. प्रीतम आठवले यांनी आपल्या कार्यकर्त्यानच्या पाठिंब्याने यशस्वी केले. यावेळी ते म्हणतात की, मोदी सरकार एका षड्यंत्राखाली सरकारी संस्थांचे खाजगीकरण करून आरक्षण संपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सदर कार्यक्रमाचे नेतृत्व अॅड. कैलास इंगोले आणि आनंद कांबळेनिं केले . सरकारी मालमत्ता, संस्थांचे खाजगीकरण करून मोदी सरकार अंबानी, अदानी सारख्या उद्योगपतींची तिजोरी भरत आहे आणि एकीकडे आरक्षण संपवण्याचे कारस्थान रचत आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाने आरक्षण पूर्णपणे संपणार आहे. त्यामुळेच या आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी त्यांच्या दुटप्पी धोरणांना कडाडून विरोध केला पाहिजे. ज्यासाठी आज आम्ही महासंघाच्या वतीने या निषेध प्रदर्शनात एकत्र आलो आहोत, असे कैलास इंगोले यांनी हे म्हटले ?
प्रीतम आठवले यांच्या म्हणण्यानुसार या प्रदर्शनासाठी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस ठाण्याची आवश्यक परवानगी घेण्यात आली होती. यावेळी उपस्थित कु.माया मगर,दिनेश डिंगे, अशोक आत्राम, दोघेही सहसचिव मंत्रालय, मुंबई, बी.एस. तायडे, माजी सहसचिव, मंत्रालय, मुंबई, नारायण नवले त्यांचे भाऊ जगन्नाथ यांच्यासमवेत आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून रमेश कांबळे, मुंबई अध्यक्ष एससी सेल, प्रमोद पाईकराव, डॉ. राहुल सूर्यवंशी, बाबासाहेब केदार, संतोष वाघ, सुनील डावरे, नाना शिंपी, राजेश सोनवणे, मंत्रालय असोसिएशनचे अध्यक्ष रमेश धिवरे माजी महासचिव , मंत्रालय असोसिएशनचे सरचिटणीस मिथिला नितीन निकाडे आदी उपस्थित होते.
विशेषत: कालीराम तोमरजी दिल्लीहून हया निर्देशनास उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आणखीनच मागे पडत आहे. बेरोजगारीसोबतच महागाई, उपासमारही वाढत आहे. मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याकांवर सातत्याने अत्याचाराच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत. हे आरक्षण वाचवण्यासाठी डॉक्टर . उदित राज वेळोवेळी एकटेच लढत आहेत. आरक्षण वाचवण्यासाठी आणि दलित, मागासलेल्यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना सर्वतोपरी साथ दिली पाहिजे.

एससी, एसटी ऑल इंडिया कॉन्फेडरेशनच्या विद्यमान कार्यकर्त्यांनी मुंबई सबब जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाचा दरवाजा ठोठावला. जिथे ते उपस्थित नव्हते. मात्र संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांचे निवेदन स्वीकारले .या कार्यक्रमा नंतर वांद्रे (पूर्व) येथील हॉटेल सेलिब्रेशन 365 मध्ये सर्वांची बैठक झाली. ज्यामध्ये एससी, एसटी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.

Previous articleदेऊळगाव राजा क्रिकेट स्पर्धेत स्टायलो संघ ठरला विजेता
Next article“कम्फर्ट नात्यांचा ” या लघुपटात भरत जाधव, निवेदिता सराफ, यशोमान, मयूरी, सुयश चा समावेश 
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.