Home कोल्हापूर पोलीस मित्र परीवार समन्वय समिती कोल्हापूर जिल्हातील पदधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या व सन्मान सोहळा...

पोलीस मित्र परीवार समन्वय समिती कोल्हापूर जिल्हातील पदधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या व सन्मान सोहळा संपन्न…!

39
0

 

कोल्हापुर – पोलीस मिञ परिवार समन्वय समिती पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांन साठी कोणत्याही समस्यासाठी साठी व सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व पदधिकारी समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.डाॅ. संघपाल उमरे सर यांच्या आदेशाप्रमाणे सतत कार्यरत असणारी समिती आहे.समितीची “गाव तिथे शाखा” हे धोरण घेऊन संपुर्ण महाराष्ट्र राज्याची कार्यकरणी मजबुत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यसल्लागार मा.सुभाषदादा सोळंके,सचिव मा.विनोद पत्रे सर यांच्या आदेशावरुन व महाराष्ट्र राज्य महीला अध्यक्षा मा.माधुरी गुजराथी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा मा.प्रा.प्रमोदीनी माने मॅडम व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.शेखर धोंगडे व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली यशराज कांफ्रेंस हाॅल कडोली येथे पश्चिम महाराष्ट्र,कोल्हापूर व जिल्हातील पोलीस मिञ परिवार समन्वय समिती पदधिकाऱ्यांच्या नव नियुक्त्या जाहिर करुन नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांचे ओळखपञाचे वापट सर्व प्रमुख पाहुण्यांच्या व सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.व सर्व नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.मा.प्रा.प्रमोदिनी माने यांनी पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या ध्येय-धोरणाविषयी,नियमावली व कार्य पध्दती व बाबत सखोल व सुंदर माहीती दिली.कार्यक्रमला प्रमुख्याने उपस्थितीत असलेल्या समितीच्या महाराष्ट्र राज्य महीला अध्यक्षा मा.माधुरी गुजराथी यांनी पो.मि.प.स.समितीची सखोल माहीती दिली.व पुढिल काळात पोलीस विभागासाठी,महाराष्ट्र राज्यातील सर्व संरक्षण विभाग व सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी कायद्याच्या चौकटित राहुन सर्व पदधिकाऱ्यांनी काय व कसे काम करायचे याबद्दलची सविस्तर माहीती दिली.व येणाऱ्या जुलै २०२२ किंवा आॅगष्ट २०२३ मध्ये समितीचे अधिवेशन पश्चिम महाराष्ट्र मध्ये घेण्याबाबत सर्वांन सोबत चर्चा करण्यात आली.सर्व नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांच्या ओळखपत्राचे वाटप करुन प्रत्येकाला आपल्या जबाबदारी बाबात महिती दिली.याप्रसंगी पोलीस मिञ परिवार समन्वय समिती कोल्हापूर विभागातील चंद्रकांत पिसे सर,अशोक ठोमके सर,शर्वरी महाव्दार,वंदना भंडारे,अमिता बिरजे,विजया माळी,शुभांगी पाटील,ज्योती खोचरे,तृप्ती खांडैकर,महेश गंथडे,सनी गंथडे,सुप्रिया चाळके,पुनम हवालदार,उज्वला पिसे,स्वाती शहा,मुरारी नराटे,शार्दूल शेटे,यशराज माने उज्वला चौगुलै,जगदीश पाटील,अमोल कदम‌,हातकलंगडे तालुक्यातील आचलकरंजी,वारणा व कोल्हापूर येथील सर्व पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या सर्व पदधिकाऱ्यांनी मा. माधुरीताई गुजराथी यांचा वाढदिवस साजरा केला.याप्रसंगी समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मा.माने मॅडम यांनी व शेखर धोंगडे व सर्व पो.मि.प.स.समिती पदधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य,मदत व परीश्रम घेतले.

Previous article‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयीच्या विशेष संवादात अभिनेत्यांनी मांडली रोखठोक भूमिका 
Next articleयवतमाळ जिल्हातील वृत्तपञाचे वार्षिक विवरण सादर न केल्याने 159 वृत्तपत्रांना कारणे दाखवा नोटीस…!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.