Home यवतमाळ माणूसधरी ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचा रत्नापुर घाटावरील नदीपात्रात आढळला मृत्युदेह

माणूसधरी ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचा रत्नापुर घाटावरील नदीपात्रात आढळला मृत्युदेह

250
0

 

यवतमाळ / घाटंजी- तालुक्यातील अखेरच्या टोकावर असलेल्या रत्नापूर नजीकच्या अरुणावती व अडाण नदीच्या संगमावर सटवाई मातेचे प्रसिद्ध असलेल्या घाटावर माणूसधरी गट ग्राम पंचायतचे कर्मचारी सुभाष किसन मडकाम वय अंदाजे ४५ वर्ष याचा मृतुदेह नदीपात्रात आढळल्याने अनेक तर्क वितर्कांना पेव फुटले आहे.
आर्णी तालुक्यातून येणारी अरुणावती नदी व अडाण नदीच्या संगमावर सटवाई मातेचे नवस फेडण्यासाठी आठवड्यातील रविवार व मंगळवारला भाविक येथे येत असतात. अश्यातच दिनांक २३ रोज बुधवारच्या सकाळी नदीच्या पात्रात एक मृत्युदेह अडकल्याचे प्रत्यक्षदर्शनीस आढळून आले. ही बाब पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत दुरक्षेत्र सावळी (सदोबा) पोलिसांना कळविण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून प्रेत बाहेर काढण्यात आले यात सदर प्रेत माणूसधरी ग्राम पंचायतीचे कर्मचारी सुभाष मडकाम यांचे असल्याचे निदर्शनास आले. तोच घडलेला प्रकार बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. सर्वा समक्ष प्रेत बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते. एक मनमिळावू स्वभावाचे सर्वांशी गुण्यागोविदाने वागणारे सुभाष मडकाम यांचा अचानक नदी पात्रात आढळलेल्या मृत्यूदेहामुळे हळहळ व्यक्त केल्या जात या संगमावर मंगळवारला गावातीलच नवस असल्याने ते या ठिकाणी जेवणासाठी आल्याचे समजते. मात्र सर्व आमंत्रित जावून सुद्धा हे एकटेच कसे थांबले ही बाब कोणाच्याही लक्षात आली नसावी काय? ते नदी पात्रात कसे पडले असावे असे एक ना अनेक सवाल उपस्थित होताना दिसत होते. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शव विच्छेदनानंतर हे पुढे येणार असून पोलिस तपासात काय निष्पन्न होणार याकडे परिसरातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहे. पुढील तपास पारवा पोलीस स्टेशन ठाणेदार विनोद चव्हाण व सहाय्यक पोलीस निरीक्षक गजभारे यांच्या मार्गदर्शनात दूरक्षेत्र सावळी (सदोबा) चे सहाय्यक फौजदार गजानन शेजुलकर, श्यामसुन्दर रायटे हे करीत करीत आहे. यावेळी रत्नापूर चे पोलीस पाटील दत्ताजी चव्हाण, तलाठी कार यांचे सह असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून दुःख व्यक्त केले.

Previous articleखुनाच्या गुन्ह्यात नागपूर कारागृह येथे आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असतांना मागील १४ वर्षापासुन फरार असलेले वर्धा जिल्हा फरार बंदी यादीतील पाहीजे असलेले आरोपी बंधु स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्या ताब्यात
Next articleमहाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ वतीने “नारीशक्ती चा सन्मान”
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.