
१०० किलोमीटरवरून आणले ४५ फूट लांब लाकूड-२०० गावकऱ्यांचा ५०० किलोमीटर चा पायी प्रवास
रवींद्र साखरे तळेगाव (शा पंत)
वर्धा – तळेगाव शामजी पंत येथील प्राचीन अवधूत महाराजांच्या मंदिरात असलेल्या झेंड्यांची नव्याने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा अभूतपूर्व सोहळा हजारो नागरिकांच्या सहकार्याने पार पडला. अवधूत महाराजांच्या झेंड्याची नव्याने प्राणप्रतिष्ठा तब्बल ५२ वर्षांनी करत असल्याचे शिरीष बुले या गावकऱ्यांनी सांगितले. म्हणजे यापूर्वी ५२ वर्षागोदर झेंडे बद्दलविण्यात आले होते. जाणकारांच्या मते मंदिरात असलेल्या आधीच्या झेंड्यापेक्षा उंचीचे झेंडे नव्याने बसविताना लागत असल्याने एवढ्या लांब उंचीचे सागवानी झाडे शोधण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक
जंगलात भ्रमण केले.मग त्यासाठी तळे गांव वनपरिक्षेत्र, आष्टी वनपरिक्षेत्र, आर्वी वनपरिक्षेत्र मध्ये जाऊन त्यांनी ४५ फूट लांब पाहिजे असलेल्या सागवानी झाडांची पाहणी केली पण एवढ्या उंचीचे झाड काही गावकऱ्यांना दिसले नाही, मग त्यांनी आपला मोर्चा मेळघाटातील जंगलात वळविला
आणि त्या जंगलात त्यांना पाहिजे असलेले सागवानी झाडे मेळघाटातील जंगल म्हणजे डोंगराळ भाग त्यात ४५ फूट लांबीचे दोन झाडे रस्त्यावर आणणे एवढे सोपे काम नव्हते,कारण जंगलात ट्रेलर जाऊ शकत नव्हता,आणि विशेष म्हणजे या झाडांचे वजन अंदाजे तीन टन असल्याचे सुद्धा गावकऱ्यांनी मग गावकऱ्यांनी साडेचार किलोमीटर अंतरावरून आपल्या खांद्यावर आणले,त्यानंतर त्या झाडांना ट्रेलर वर टाकून प्रवास सुरू माला. या सर्व प्रक्रियेत ३ ते सव्वातीन लाख रुपये खर्च आला,
हा सर्व खर्च लोकवर्गणीतून करण्यात आला. अखेर ३ मार्चलाफाल्गुन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर झेंड्यांचे आरोहण करण्यात आले. आता गुढीपाडव्याच्या प्रतिपदेला झेंड्याना कापड चढवून गुढीपाडवा ते रामनमवी च्या पर्वावर रामकथेचे आयोजन करून रामनमवी नंतर दशमीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.










































