Home जळगाव पत्रकार संरक्षण समिती भुसावळ तालुकाध्यक्ष पदी सुमित निकम यांची नियुक्ती…

पत्रकार संरक्षण समिती भुसावळ तालुकाध्यक्ष पदी सुमित निकम यांची नियुक्ती…

413

जळगाव –   “पत्रकार संरक्षण समिती” महाराष्ट्र राज्य चे राज्य अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा अध्यक्ष आत्माराम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात “पत्रकार संरक्षण समिती” च्या बैठकीत भुसावळ तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी दैनिक लोकमत चे दिपनगर येथील पत्रकार सुमित निकम यांची भुसावळ तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी रावेर ग्रामीण तालुका समितीच्या अध्यक्ष प्रदीप राज पंजाबी, फरिदभाई शेख, राजेश निकम, सुनिल आराग, सत्यकाम न्युज कार्यकारी संपादक कुंदन बेलदार आदींसह मोठय़ा संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. सुमित निकम यांची भुसावळ तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.