Home विदर्भ अमरावती मनपा मध्ये सत्ता काबीज करुन निळा झेंडा फडकविण्याचा संयुक्त रिपब्लिकन आघाडी...

अमरावती मनपा मध्ये सत्ता काबीज करुन निळा झेंडा फडकविण्याचा संयुक्त रिपब्लिकन आघाडी चा संकल्प

404

मनिष गुडधे
अमरावती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत रिपब्लिकन विचारांना गतीमान करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या संयुक्त रिपब्लिकन आघाडी च्या वतीने ‘रिपब्लिकन एकता दिवस’ म्हणुन आज २८ फेब्रुवारी रोजी स्थानिक अमरावती येथील महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पाळण्यात आला. या निमित्ताने आंबेडकरी चळवळीशी निगडीत अशा सर्व पक्ष व संगठनांना एकत्रित आणण्याच्या उदात्त हेतु समोर ठेवुन सर्व गटा-तटात विखुरलेल्या पक्ष संघटनांना आघाडीत सामील होण्याचे विनम्रपणे आवाहन करण्यात आले.

संयुक्त रिपब्लिकन आघाडी चे मुख्य निमंत्रक अँड.पी.एस.खडसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजित धरणे कार्यक्रमास सुरवात करण्यापुर्वी महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आघाडीचे नेते प्रा. डॉ. गोपीचंद मेश्राम, विनायक दुधे व मा. राजेश वानखडे यांच्या हस्ते माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. आघाडीचे नेते मा. चरणदास इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन उपस्थित सर्वांच्या वतीने निळ्या झेंड्यास मानवंदना देण्यात आली. रिपब्लिकन एकतेचा जयघोष करण्यात आला.

मनपा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर एकाच निळ्या झेंड्याखाली सर्वांना एकत्रित आणुण सर्वशक्तीनिशी अमरावती महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचा संकल्प करण्यात आला. राजकीय महत्वाकांक्षा व गटा-तटाच्या राजकारणामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आंबेडकरी अनुयायांच्या मतांचे विभाजन झाले. त्यामुळे प्रत्येक वेळी रिपब्लिकन पक्षाला सत्तेपासुन वंचित राहावे लागले. हे टाळण्यासाठी यावेळी तयार करण्यात आलेल्या संयुक्त रिपब्लिकन आघाडीने “एकत्र येवुन मनपा लढाई” अशा एकमेव उद्देश्याने प्रेरित होवुन आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करणे, रिपब्लिकन एकतेला सर्वोच्च प्राधान्य देणे, समाज बांधवांपर्यंत रिपब्लिकन एकतेचा संदेश पोहचविणे व त्यांच्या मनात रिपब्लिकन विचारांची आस्था निर्माण करणे. आंबेडकरी चळवळीशी निगडीत अशा सर्व पक्ष व संघटनांना एकत्रित आणणे, एकसंघपणे मनपा निवडणुकीला सामोरे जाण्याचा दृढ संकल्प करत समाजातील सर्वसामान्य स्तरातील लोकांना उमेदवारी देणे व अमरावती मनपा निळ्या झेंड्याखाली काबीज करण्याची भीम प्रतिज्ञा या धरणे कार्यक्रमात करण्यात आली. तसेच आघाडी च्या सर्व नेत्यांनी रिपब्लिकन एकता दिनाच्या पर्वावर रिपब्लिकन एकतेचा संदेश दिला.

या कार्यक्रमात उपस्थिती:
मा. चरणदास इंगोले (पिपल्स रिपब्लिकन पार्टी), प्रा. गोपिचंद मेश्राम (खोरीपा), प्रा. सतिश सियाले (रिपब्लिकन सेना), अँड. पी. एस. खडसे (भीमशक्ती संघटना), अँड. सिद्धार्थ गायकवाड (पब्लिक पार्लिमेंट) प्रा. विनायक दुधे (रिपब्लिकन सेना), मा. मनिष साठे (आझाद समाज पार्टी), मा. राजेश वानखडे ( भीम ब्रिगेड संघटना) मा. किरण गुडधे ( जय संविधान संघटन), मा. शितलताई गजभिये ( आँल इंडिया पैन्थर सेना), प्रा. जगदीश गोवर्धन,सुनिल रामटेके, (रिपाई आठवले) , सविताताई भटकर ( रिपाई गवई), क्रांतीभुषण खडसे, प्रा. कशीनाथ खडसे. समाधान वानखडे, दिपक मेटांगे, हिदायत खान, प्रफुल्ल डोंगरे, जे एम गोंडाणे, दादासाहेब क्षिरसागर, विक्रम तसरे, शरद वाकोडे, केशव वानखडे, नितीन काळे, राजेश बरगडे, विजय खंडारे, विजय मोहोड, अंकुश आठवले, सतिश दुर्योधन, संघपाल खंडारे, उमेश दुर्योधन, बुद्धदास इंगोले, सौ. शोभाताई सियाले, सुरेन्द्र टेंभुर्णे, चंद्रभान मोहोड, जानराव वाटाणे, मनोहर बारसे, मेजर महादेव खंडारे, पंजाबराव सुरवाडे, विनोद भालेराव, सौ. लिलाबाई तागडे, विद्या बोधनकर, रिणा ढवळे, मिलींद तायडे,रजित चव्हाण, प्रा. वाल्मीक ढवळे, उत्तमराव बोरकर, मनोहर घोडेस्वार, विजय वानखडे, रमेश गजभिये, ओमप्रकाश बनसोड, प्रल्हाद मेश्राम, आनंद इंगळे, बाळासाहेब गवई, महेंद्र भालेराव, राजकुमार तायडे, प्रा. गजानन फुके, विवेक जवंजाळ, राजु चोथमल, अनिल खंडारे, व्ही एम वानखडे, किरण गुडधे, अन्सार बेग, मंगेश कनेरकर, यश सिरसाठ, मंगेश तायडे, विशुध्दानंद जवंजाळ, सौ. वैशाली काळे, सोनु वानखडे, प्रांजली गोंडाणे, रेखा गोंडाणे, पद्मा गवई, अनुसया गोंडाणे, भिमाबाई लोणारे, मेघा नागदिवे, आम्रपाली बांगर, सरिता खंडारे, दुर्गा दांडगे, चंद्रकला रंगारी, सोनु पाटील, सरिका तायडे, संगिता तायडे, मिना चुंबळे, सचिन तेलमोरे, गोपाल ढेकेकर, अरविंद नगराळे, अँड. दिपक आकोडे, डॉ. अशोक गुर्जर, किशोर गोसावी, आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.