
जळगाव :(शाह एजाज़ गुलाब)
मिल्लत हायस्कूल मेहरून जळगाव, येथे आज दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी ” मराठी भाषा गौरव दिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीमराठीतच विविध लोकगीते, पोवाडे, कविता आणि सिंधुताई सपकाळ, आदी विषयांवर भाषणे, हम्द शरीफ,नात शरीफ (प्रेषित स्तुती काव्य) अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. मराठी विभागप्रमुख वसीम शेख यांनी मराठी भाषेच्या दैदिप्यमान इतिहास सांगितले.

तसेच वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जीवनावर एक चित्रफीत प्रोजेक्टरवर दाखवण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका अफिफा शाहीन मॅडम यांनी मुलांशी बोलताना मराठी भाषेचे महत्व पटवून दिले. मराठी विभागाच्या सर्व शिक्षकांना शाळेतील इतर शिक्षकांनी गुलाब पुष्प देऊन मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ” उर्दू माध्यमाचे विद्यार्थि असूनसुद्धा मराठी भाषेतील कविता व भाषणे अतिशय सुस्पष्टपणे व उत्तम उच्चाराने सादर केलीत त्याबद्दल मला खूप आनंद झाला. ” असे अध्यक्षीय भाषण देताना मिल्लत एजुकेशनल संस्थेचे आबीद अली यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले. तसेच अतिशय सुरेख सादारीकरणाबद्दल उपस्थितांनी विद्यार्थ्यांना बक्षीसरूपी रोख १५०० रुपये दिले.शाळेचे पर्यवेक्षक ताजुद्दीन शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला मेहरूण भागाचे नगरसेवक प्रशांत भाऊ, माजी पर्यवेक्षक रफीक पटवे, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी अतिशय आनंदाने आणि थाटाने हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मिल्लत हायस्कूलच्या मराठी विभागाचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
*छायाचित्रात :* १) मराठीत समूहगीत सादर करतांना इयत्ता ५वि (अ) ची विद्यार्थिनीअलींना कौसर सोबत सहकारी विद्यार्थिनी , तसेच डावीकडून उपस्थित मान्यवर दिसत आहेत.
२) मराठीत समूहगीत सादर करतांना विद्यार्थिनी , तसेच डावीकडून उपस्थित वसीम शेख,प्रशांत भाऊ,रफिक पटवे,सय्यद आबिद अली, ताजोद्दिन शेख व अफिफा शाहीन दिसत आहेत.











































