Home महत्वाची बातमी पचमढी दर्शनाला जाताना कारचा अपघात

पचमढी दर्शनाला जाताना कारचा अपघात

729

तीन युवकांचा जागीच मृत्यू

रविन्द्र साखरे आष्टी (शहीद):-

वर्धा –  मध्यप्रदेशातील पचमढी येथे भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी जाताना कार क्र.MH 02-BG 3204 चा अपघात झाला.यामध्ये तीन युवक जागीच ठार झाले.

१)तुषार ज्ञानेश्वरराव झामडे वय 30 वर्ष, रा.आबाद किन्ही ता.आष्टी २)दीपक भाऊरावजी डाखोरे, वय 30 रा. आष्टी
३)अक्षय गौरखेडे, वय26
रा. तिवसा, जि. अमरावती काल दिनांक 27 फेब्रुवारीला मृतक तुषार झामडे याने आपल्या कारणे तीन मित्रासह पचमडी ला जाण्याचा कार्यक्रम ठरविला. सायंकाळी 6 वाजता आष्टी वरून पचमडी कडे रवाना झाले. पचमडीच्या काही अंतरावर पोहोचण्याआधी मध्यरात्री 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांची कार वळणावरील एका भिंतीला धडकली.
यावेळी कार चार वेळा पलटी झाली. यामध्ये तिघे जण जागीच मृत्यू पावले. असून त्याचा एक मित्र यामधून सुदैवाने बचावला. घटनेची माहिती आष्टीला पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.