Home मराठवाडा ज्ञानगंगा इंग्लिश शाळेला आयकॉन ऑफ एज्युकेशनने सन्मानित

ज्ञानगंगा इंग्लिश शाळेला आयकॉन ऑफ एज्युकेशनने सन्मानित

215

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

ज्ञानगंगा इंग्लिश शाळेने अवघ्या सहा वर्षात आयकॉन ऑफ एज्युकेशन अवार्ड मिळवला आहे.ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलला लोकमत समूहाकडून आयकॉन ऑफ एज्युकेशन जालनाचा पुरस्कार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जिल्हाधिकारी विजय राठोड,मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल,नंदकिशोर पाटील,डी.वाय.कुलकर्णी यांच्या हस्ते जालना येथे देण्यात आला आहे.

ज्ञानगंगा इंग्लिश स्कूल ही अंबड तालुक्यातील एकमेव पुरस्कारांची मानकरी ठरली आहे.शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार लोकमतने शाळेला दिलेला आहे.शाळेत विविध स्पर्धा उपक्रम गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी एकमेव शाळा आहे.

वडीगोद्री व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आहे.सदरील शाळेत आत्तापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाळेला भेटी दिलेल्या आहेत.शाळेत आत्तापर्यंत विविध उपक्रम राबवून तालुक्यातील एकमेव उत्कृष्ट शाळा म्हणून नावलौकिक मिळविलेला आहे.शाळेला पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष सोमनाथ बप्पासाहेब काळे पाटील,सुनील काळे,वैभव दातवासे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून फोनवरून शुभेच्छा दिलेल्या आहेत.

तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश होंडे,दीपक पवार,अनिरुद्ध हर्षे,प्रसाद पिंगळे,सुरज काळे,राजेंद्र छल्लारे,सुरेश काळे,माणिक नल्लेवाड,अंगद खांडेभराड,नितीन काळे,पवन काळे,सचिन गावडे,कीर्ती नंद गांगुर्डे तसेच शाळेतील कर्मचारी टी.एन.पठाण,के.डी.काळे,व्ही.बी. गावडे,आर.डी.आटोळे,लाहुरे,शिरस्कर, हरिश्चंद्र गावडे,कुलदीप आटोळे,बळीराम कणके,कैलास लंगोटे,किशोर काळे,शुभम परदेशी,सुभाष पवार आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.या पुरस्काराचे मानकरी शाळेतील सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक व शाळेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणारे सर्व आहेत.