
इकबाल शेख – वर्धा
फिर्यादी नामे प्रफुल माणिकचद पंचासरा वय 50 वर्ष, रा.एमआयडीसी सेवाग्राम यांनी दि. 24/02/2022 रोजी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिली की, ते सुपरवायर म्हणुन काम करित असलेली एसआर ईंजिनिअरींग कंपनी मधील पेरणी यंञाचे 41 लोखंडी दाते प्रती नग कि. 500 रु प्रमाणे एकुन 20500 रु चा माल कोणीतरी चोरुन नेला आहे.
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल गुन्हे प्रकटीकरण पथकाने घेवून पो. स्टे. परिसरात गुप्त बातमीदार नेमुन गुप्त बातमीदाराकडुन मिळाले ल्या माहिती प्रमाने दोन महिला आरोपीस अटक करुन त्याचे जवळुन गुन्ह्यात चोरलेले मधील पेरणी यंञाचे 41 लोखंडी दाते वेगवेगळ्या आकाराचे व वेरायटीचे प्रती नग कि. 500 रु प्रमाणे एकुन 20500 रु चे जप्त करण्यात आली.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे पोलीस स्टेशन सेवाग्राम याचे निर्देशाप्रमाणे पो. हवा. हरिदास काकड, नापोशि. गजानन कठाणे, जयेश डांगे, पोशि पवन झाडे अभय ईगळे, प्रगती झामरे नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम यांनी केली.










































