Home यवतमाळ घाटंजी येथील विधी सेवा समितीचा उपयोग नागरिकांनी करावा – न्यायाधिश एफ. टी....

घाटंजी येथील विधी सेवा समितीचा उपयोग नागरिकांनी करावा – न्यायाधिश एफ. टी. शेख

556

 

( अयनुद्दीन सोलंकी )
घाटंजी – मा. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या आदेशान्वये विधी सेवा समितीची स्थापना प्रत्येक तालुक्यात करण्यात आलेली आहे. त्याचा उपयोग जनतेने घ्यावा, असे आवाहन
तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांनी केले. ते पारवा पोलीस ठाण्यात आयोजित तालुका विधी सेवा समिती तथा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक, ज्ञानदान शिबिर, जातीय सलोखा व शांतता बैठकीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
शेख म्हणाल्या की, गावातील गोरगरीब, मजूर वर्ग व इतरांना त्यांचे हक्क अद्यापपर्यंत माहीतच नाही.

त्यांना न्यायालयासाठी खर्च लागतो याची भीती त्यांना नेहमी सतावत असते. त्यामुळे सदर लोकन्यायालयाची पायरी चढत नाही. मात्र मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी वकील देण्याचे प्रावधान करण्यात आलेले आहे. सदर काम तालुका विधि सेवा समिती अंतर्गत दिल्या जाते. त्यामुळे जनतेने विधिसेवा केंद्राचा उपयोग करावा. तरच सदर शिबिर संपन्न झाल्याचे समाधान वाटेल, असे म्हणाले.
या वेळी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांनी पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केल्या बद्दल शेख यांनी त्यांचे आभार मानले. प्रमुख अतिथी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष उमरे, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, घाटंजी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड. अनंतकुमार पांडे, सचिव अँड. सादीक खान, यवतमाळ येथील युनिक ॲकॅडमीचे सचिन राऊत, घाटंजी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देवतळे, अरुण कांबळे, पांडुरंग निवल, संजय ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक घाटंजी तालुका वकील संघाचे सचिव अँड. सादीक खान यांनी केले. या प्रसंगी घाटंजी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड. अनंतकुमार पांडे यांनी वयोवृद्ध नागरिक व त्यांच्या अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. पत्रकार अरुण कांबळे यांनी बालकांचे कायदे, हक्क, अधिकार व बालविवाह या बाबतची माहिती विषद केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष उमरे यांनी लोकप्रतिनिधी व ईतरांनी लाच वगैरे मागितल्यास सबंधित कार्यालयात तक्रार नोंदवविण्याचे आवाहन केले. यवतमाळ येथील युनिक ॲकॅडमीचे सचिन राऊत यांनी पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्या मध्ये स्पर्धा परीक्षेसाठी करण्यात येणाऱ्या तयारीसाठी यथायोग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक उर्जा प्रदान केली.
ग्रामीण भागातील जनतेला कायद्याची माहिती व्हावी त्यांच्यात कायद्या विषयी जनजागृती व्हावी या उदांत्त उद्देशातून तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन मध्ये कायदेविषयक ज्ञानदान मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी वन्यजीव विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी विवेक येवतकर (टीपेश्वर), पारवा वन परिक्षेत्र अधिकारी मनिष पवार, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता इंगोले आदीं मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील बालक, एकल महिला, शेतकरी, शेतमजूर वंचित कुटुंब, मजूरदार वर्गाची परिस्थिती हलाखीची असते. आणि त्यांचे एखादी प्रकरण न्यायालयात दाखल झाले की त्यांनी घाबरून जावू नये. अन्याय ग्रस्त या विरोधात न्याय मागण्यासाठी न्यायालयात वकीलामार्फत प्रकरण दाखल करावे लागते. परंतु ज्यांची परिस्थिती नाही व वार्षिक उत्पन्न तीन लाखांच्या आत आहे अश्या नातेवाईकांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्यास त्यांना विधी न्याय विभागाकडून ५० हजार रुपये ते तीन लाख रुपयांपर्यंत सहाय्य करून न्यायालयामार्फत वकील मिळवून दिल्या जाते. याची माहिती देण्यात आली. शिवाय काही किरकोळ प्रकरणे सुध्दा भिती पोटी तसेच राहतात. मात्र न्यायालयात अश्या नागरिकांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्यास त्यांना मोफत मार्गदर्शन केले जाते. यातून आपसी समझोता सारखे प्रकरणाचा निपटारा होवू शकते.
या वेळी शहिद जवान ज्ञानेश्वर आडे यांच्या पत्नी कुंतीताई आडे याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पारधी समाजातील युवक राजू राठोड यांनी योगासनाचे धडे दिले. या वेळी घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांनी राठोड याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, सर्व अंमलदार,पोलीस शिपाई व गृहरक्षक दल यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील व सावळी (सदोबा) पोलिस चौकी अंतर्गत येणारे पोलीस पाटील, तंटामुक्त गांव समितीचे अध्यक्ष, पत्रकार, युवक, युवती आदीं परिसरातील नागरिक आवर्जुन उपस्थित होते.

पारवा येथे झालेल्या कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर, शांतता व सलोखा समितीच्या बैठकीमध्ये पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी पारवा पोलीस स्टेशन मधील क्राईम रेट कमी झाले आहे. सोबतच या नंतर ज्या गावात क्राईम कमी असेल किंवा कमी राहील, अशा गावांत ग्रंथालयाची स्थापना करू, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.

विनोद चव्हाण,
ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक, पारवा ता. घाटंजी