Home जळगाव रावेर येथे सत्यशोधक महात्मा फुले व्यायाम शाळेच्या वतीने उत्साहात शिव जंयती साजरी

रावेर येथे सत्यशोधक महात्मा फुले व्यायाम शाळेच्या वतीने उत्साहात शिव जंयती साजरी

298

 

रावेर(शेख शरीफ)

रावेर येथे 19 फेबुवारी अंखड महाराष्ट्राचे दैवत राजे शिव छत्रपतीं शिवाजी महाराज जंयती उत्साहात सत्यशोधक व्यायाम शाळेच्या वतीने साजरी करण्यात आली काल रात्री 8 वाजेच्या दरम्यान क्रांती ज्योती महात्मा ज्योतीबा फुले यांच्या अर्धे कृति पुतळ्या जवळ सर्व व्यायाम शाळेचे कार्यकर्ते तरुण यांनी ज्योतीबा फुले यांचे आदर्श राजे शिवराय यांची आत्मचरित्र याचा अभ्यास करून हे महाराष्ट्राचे दैवत असुन त्यांच्या कार्याचा उजाळा होणे गरजेचे होय त्यानुसार त्यांची समाधी सर्वात आधी शोधुन काढली इस 18 70 ‘ मध्ये पहीली शिवंजयती साजरी केली तसेच महाराज यांच्या कार्य , इतिहास लोकासमोर जावा खऱ्या जाणत्या राजाची जंयती व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवुन कार्य केले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पण 20 शतकात बाबासाहेबांनी पण दोन 1927 मध्ये बदलापुर येथे झालेल्या शिवजंयती चे अध्यक्ष पद भुषविले होते तेथील गावकरी यांनी स्वता निमंत्रणे पाठवली होती अश्या तिघां महा मानवाची कर्म भुमी महाराष्ट्र होय
काल रात्री आधी शिव छत्रपती यांच्या पुतळ्यास विधीवत पुजन करून नंतर महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्या स पुष्पहार करण्यात आला पुतळ्या जवळ लख्ख प्रकाशाने उजळले होते तर अतिशबाजी करीत राजे यांच्या जंयती करण्यात आली त्यादरम्यान महात्मा ज्योतीबा फुले नगर , सावित्रीबाई नगर भागातील शिवप्रेमी तसेच सुधाकर महाजन , पत्रकार ईश्वर महाजन , प्रकाश महाजन ,पहेलवान गृपचे तालुका अध्यक्ष रवि पाटील, सत्यशोधक व्यायाम शाळेचे अध्यक्ष योगेश महाजन व गोपाळ महाजन , सोपान महाजन , बाळा महाजन, बंन्टी महाजन , बंन्टी चौधरी , राहूल महाजन , भैय्या महाजन श्री जय महाजन, चेतन महाजन , मुकेश महाजन , निलेश महाजन , निखील महाजन , पवन ,करण लोणारी, कमलेश महाजन अनेक समाज उपस्थीत होते.