
प्रतिनिधी – प्रशांत नाईक
वर्धा / पुलगाव – आर्वी पुलगाव रोडवर नादुरुस्त उभा असलेल्या ट्रकवर पुलगाव वरून येणारी दुचाकी क्र MH32AR2256 हि मोटारसायकलने एवढी जबर धडक दिली कि दुचाकी वर असलेले दोन युवक नामे 1)सचिन उमेश कनेरी वय 27व 2)सुरज किशोर ढोले वय 25 दोघेही राहणार रसूलाबाद जागीच मृत झाले. अपघात एवढा भीषण होता कि मोटारसायकल चा समोरील चक्का टिप्पर च्या मागच्या चाकात फसल्याने ट्रॅक्टर च्या साहाय्याने काढावा लागला.

अपघाताची माहिती मिळताच रसूलाबाद चे सरपंच, पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत दोन्ही युवक जागीच गतप्राण झाले होते.घटनेची माहिती पुलगाव पोलीस स्टेशन ला मिळताच पोलीस स्टेशन चे ठाणेदार शैलेश शेळके आपल्या कर्मचाऱ्यांना समवेत घटनास्थळी दाखल झाले.घटना स्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शव विच्छेदना करिता पुलगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे .पुढील तपास पुलगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.










































