Home विदर्भ अमरावती मनपा आयुक्तांच्या अंगावर महिलेने फेकली शाई…!

अमरावती मनपा आयुक्तांच्या अंगावर महिलेने फेकली शाई…!

184

शिवप्रेमींचा राडा ,राजापेठ उड्डाणपूल सुद्धा आता हटवणार जाहीर निषेध…!

मनिष गुडधे –  8999776984

अमरावती ‌- शिवप्रेमींचा आयुक्तांना निवेदन देताना राजापेठ उड्डाणपूल सुद्धा हटवणार आहे या विरोधात जाहीर निषेध करत या विरोधात एका महिलेने आयुक्तांच्या अंगावर फेकलीं शाई , माहितीनुसार… मा जिजाऊ यांच्या जयंतीच्या शुभपर्वावर 12 जानेवारी २०२२ रोजी राजापेठ उड्डाणपुलावर शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती परंतु 16 जानेवारी 2022 ला अर्ध्या रातरी तेथून पोलीस बंदोबस्तात तो पुतळा तिथून हलवण्यात आला .तसेच ज्या ठिकाणी त्या पुतळ्याची स्थापना केली होती ,तो चबुतरा सुद्धा रतोरात काढण्यात आला. ही शिवाजी महाराजांची विटंबना आहे असे शिवसैनिकांचे म्हणणे असून ,त्यांना मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांसाठी लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून उभारलेला शासनाच्या कोट्यावधी रुपये तूं बांधण्यात आलेला राजापेठ उड्डाणपूल सुद्धा आता हटवणार आहे.आता उड्डाणपूल हटवणे म्हणजे संपूर्ण नागरिकांची व शासनाच्या कोट्यावधी रुपयांचे नुकसान आहे या उड्डाण पुला करिता नागरिकांनी जवळपास सात ते आठ वर्ष जो त्रास सहन केला आहे जो मानसिक त्रास सहन केला आहे तो पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे याकरिता आपल्या अशा आकस बुद्धीचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा आम्ही शिवप्रेमी युवक अशा कृती चा जाहीर निषेध करतो असे म्हणत एका महिलेने आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली .