Home महत्वाची बातमी पोलीस बॉईज असोसिएशन महिला आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष पदी सौ. सक्षिताई साईनाथ ठाकरे...

पोलीस बॉईज असोसिएशन महिला आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष पदी सौ. सक्षिताई साईनाथ ठाकरे यांची नियुक्ती

475

ठाणे – पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी ठाणे जिल्ह्यातील अंबाडी येथील रहिवासी असलेल्या सौ. साक्षी साईनाथ ठाकरे यांची पोलीस बॉईज असोसिएशन महिला आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. दिनांक 06 / 02 / 2022 रोजी ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात ही निवड करण्यात आली. साक्षी ठाकरे या विद्या प्रबोधिनी इंग्लिश मिडीयम स्कूल पेटी येथे मेंबर अध्यक्ष पदी आहेत तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यामधे सुद्धा त्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात तसेच सोमेश्वर महिला बचत गटाच्या त्या अध्यक्षा आहेत.

मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांना साक्षी ठाकरे यांनी जेवण ,चहा, तसेच नाष्टा व पाण्याची सोय केली होती. पोलीस खात्यात असणाऱ्या पोलीस बांधवांच्या पाठीशी त्या सतत खंबीरपणे उभ्या असतात, तसेच वेळोवेळी त्या पोलीसांच्या मदतीला धाऊन जातात. त्यामुळे पोलीस बंधवांबद्दल असलेली आपुलकी व तळमळ पाहून तसेच सतत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्यामुळे त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद वाघमारे यांनी सौ. साक्षी साईनाथ ठाकरे यांची पोलीस बॉईज असोसिएशन महिला आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

चाने गावामधे झालेल्या पोलीस बॉईज असोसिएशनच्या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी पोलीस बॉईज असोसिएशन मुंबई प्रदेश अध्यक्ष सय्यदराजा मुजावर , ठाणे जिल्हाध्यक्ष साईनाथ ठाकरे , चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे , पालघर जिल्हाध्यक्ष यशवंत भारद्वाज तसेच चाने गावातील ग्रामस्थ व महिला यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.