
कर्मभोगावर कर्मयोगाने विजय मिळविणे शक्य आहे. कधीच स्वतःच्या नशिबाला कोसायचं नाही. परिस्थिति कशीही असु द्या, स्वस्थिती दृढ असली पाहिजे. माता भगिनींनी स्नान झाल्याशिवाय किचन मध्यें प्रवेश करू नये, सूर्योदयापूर्वी आंघोळ करायची.लक्ष्मी तिथेच नांदते, जिथे स्वछता आणि पावित्र्य आहे.’ असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी प्रणिता बहेन यांनी येथे केले.

घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे नुकताच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने ज्ञान सरिता हा कार्यक्रम दोन सत्रात संपन्न झाला. या कार्यक्रमात परभणी सेंटर अंतर्गत असलेल्या पुर्णा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका ब्रह्माकुमारी प्रणिता बहेन यांचे अनमोल असे व्याख्यान झाले. कार्यक्रमास पाथरी सेंटरच्या मुख्य संचालिका शांता बहेन,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय कंटुले,पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर,डॉ.राजुरकर,अरविंद दहिवाळ,भरतराव कंटुले,विष्णुआप्पा कंटुले,कल्याण कंटुले,ज्ञानेश्वर कंटुले,पत्रकार किशोर शिंदे,पत्रकार गणेश ओझा,एजे पोकळे,जयश्री पाटील,भगवान पाटील,संतोष लोया,
ज्ञानेश्वर तापडीया,बाळुभैया कंटुले यांच्यासह माताभगिनी मोठय़ा संख्येने उपस्थीत होत्या.व्याख्यान प्रवाहात प्रणिती बहेन पुढे म्हणाल्या, ‘ ज्ञान प्रकाश आहे.ज्ञान मार्गात पण विधी आहे. कलियुगाच्या अंतीम टप्प्यात,संगमयुगामध्ये १९३७ साली शिवबाबाचे ब्रह्माबाबामध्ये अवतरण झाले आणि ईश्वरीय ज्ञान मिळत आहे. ज्ञानप्राप्तीसाठी योगशक्ती वाढविणे आवश्यक आहे. अशरिरी अवस्थेत व्यर्थच विचार खुप चालतात.कोण कसं वागतं,काय बोलतं,ज्याचेत्याचे कर्मअसतात.त्यामध्ये लक्ष घालणे,त्यासंबंधी बोलणे व्यर्थ आहे. जो स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो इश्वर त्याची मदत करतो.यथार्थ बुद्धीने विचार स्विकार केला तर मन स्विकारत.पहाटे उठल्याबरोबर’ मी भाग्यशाली आत्मा आहे’ असे स्वमान ठेवले पाहिजे. ज्या घरात ईश्वराला भोग लागतो तेथे रोगराई नसते. असेही प्रणिता बहेन यांनी शेवटी सांगितले. ‘ज्ञानसरिता ‘ या कार्यक्रमाच्या आयोजक ब्रह्माकुमारी दिपा बहेन यांनी स्वागत करून उपस्थितांचे आभार मानले.











































