Home जळगाव जमीअत उलमा हिंद व हुफ़्फ़ाज फाउंडेशन तर्फे फारुक शेख सन्मानित

जमीअत उलमा हिंद व हुफ़्फ़ाज फाउंडेशन तर्फे फारुक शेख सन्मानित

342

पत्रकारांचा सुद्धा गौरव

रावेर (शेख शरीफ)
जळगाव जिल्हा जमियत उलमा हिन्द या राष्ट्रीय संस्थेमार्फत तसेच जळगाव जिल्हा हुफ्फाज फाउंडेशन च्या माध्यमाने जळगाव शहरातील मुफ़्ती हारून नदवी, डॉक्टर अब्दुल करीम सालार व फारूक शेख यांना शाल बुके व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच याच कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांचा सुद्धा गौरव करण्यात आला..
सदर कार्यक्रम इक़रा एच जे थीम महाविद्यालय,मेहरुन च्या हॉलमध्ये घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर पिंच बॉटलींग चे चेअरमन जफर शेख, नगरसेवक रियाज बागवान, इब्राहिम पटेल, अक्रम देशमुख, राष्ट्रवादीचे साहिल पटेल, काकर बिरादरीचे रियाज़ काकर, जमिअतचे कलीम पटेल, काँग्रेस आय चे बाबा देशमुख, मुश्ताक करीमी, रागिब ब्यावली आदींची प्रमुख उपस्थिती होती.

*फारुक शेख यांना खादिम ए कौम पुरस्कार*

जळगाव शहरात नव्हे तर जिल्ह्यात जळगाव जिल्हा मनियार बिरादरी, मुस्लिम ईदगाह व कब्रस्तान ट्रस्ट, कोविड केअर सेंटर च्या माध्यमाने फारुक शेख हे करीत असलेल्या कार्याबाबत त्यांना  खादीम ए कौम* हा पुरस्कार रहमानी मीडिया व वल हुफ्फाज फाउंडेशन चे कारी शफिक रहमानी यांच्या हस्ते देण्यात आला.

*मुशायरा चे दीप प्रज्वलन शेख यांच्या हस्ते*

सदर गौरव समारंभ झाल्यानंतर खानदेश स्तरीय मुशायरा चे आयोजन करण्यात आले होते या मुशायरा चे शमा (दीपप्रज्वलन) फारुक शेख यांच्या हस्ते करण्यात आले.