Home मराठवाडा माऊली गुळयुनिटच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतक-यांना दिलासा – डॉ.हिकमत उढाण

माऊली गुळयुनिटच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतक-यांना दिलासा – डॉ.हिकमत उढाण

417

घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा येथील सुरासे बंधु यांच्या माऊली गुळयुनिटचे उद्घाटन
६ फेब्रुवारी,रविवार रोजी शिवसेना संपर्क प्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या हस्ते करण्यात आले.
गुळयुनिटच्या माध्यमातून हजार ते बारासे हेक्टरच्या ऊस गाळपाचे उदीष्ट असल्याने ऊस उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे , दररोज ३ एक्कर ऊसाचे गाळप होणार आहे. भाव कमी असला तरी फेब्रुवारीत गेलेला ऊस वजनदार भरत असल्याने, मे मध्ये ऊसाचे भरपुर वजन घटते त्यामुळे शेतक-यांचे गुळयुनिटला ऊस दिल्यामुळे फारसे नुकसान होत नाही .असे डॉ.हिकमत उढाण यांनी या प्रसंगी म्हटले. या प्रसंगी चेअरमन श्रीरंग गुजर,सामाजिक कार्यकर्ते मधुकर खरात , जि.प.सदस्य संभाजी उबाळे, शिवसेना तालुका प्रमुख उद्धव मरकड, शाम उढाण,पो.पा. कैलास सोळंके,अशोक शिंदे
राधाकिसन सुरासे, अंकुश रोकडे, बळी नखादे ,दत्ता सुरासे, संदिप कंटुले, राजु कंटुले , नानामहानुर
,अनिल सानप ,परमेश्व सुरासे, तुकाराम सुरासे,रघुनाथ ताठे, श्रीरंग सुरासे,जगन सुरासे,बंडू सुरासे ,श्रीधर सुरासे बंडु कुलकर्णी ,संजय सुरासे आदिंची उपस्थिती होती. सर्व उपस्थितीचा सत्कार शिवाजी सुरासे,श्रीरंग सुरासे यांनी केला. शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थितीचे आभार मानण्यात आले.