Home जळगाव रावेर येथील अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त घोषित

रावेर येथील अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त घोषित

206

रावेर :(एजाज़ गुलाब शाह ) – शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जन मानवता बहुद्देशीय संस्था चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा जगातिक स्तरावर तंबाखूमुक्त शाळांचा होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत त्या अनुषंगाने जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जळगाव अंतर्गत व तालुका गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर तंबाखूमुक्त घोषित करण्यात आली. जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती सदस्य व ब्रँड अँबेसिडर जिल्हा तंबाखू मुक्त अभियान श्री राज मोहम्मद खान शिकलगर व रावेर तालुका तंबाखू मुक्त शाळा अभियान समन्वयक प्रफुल्ल मानकर सर व केंद्रप्रमुख राईसुद्दीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले. उर्दु केंद्रा चे केंद्रप्रमुख राईसुद्दीन

शेख यांनी शाळेचे मुख्याध्यापक फिरोज खान समद खान व सर्व उप शिक्षकांचे अभिनंदन केले.