Home मराठवाडा ट्रकची दुचाकीला धडक , “एक जण जागीच ठार”

ट्रकची दुचाकीला धडक , “एक जण जागीच ठार”

308

एक जण गंभीर जखमी

औरंगाबाद रोडवरील नागेवाडी गावाजवळ घडला अपघात

जालना-लक्ष्मण बिलोरे

औरंगाबादकडून जालन्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने आज दुपारी 4.45 वाजता नागेवाडी बुद्ध विहाराजवळ मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
या अपघातात मोटारसायकलस्वार शेख चाँद शेख समशेर (६०) हे जागीच ठार झाले.
मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला एकजण गंभीर जखमी असून, त्याला पोलिसांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांच्यासह अंमलदार राहुल काकरवाल, किरण चव्हाण हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करून मदतकार्य केले.
मयत व जखमी हे जालना तालुक्यातील पाचन वडगाव येथील आहेत.