Home यवतमाळ घाटंजी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार भरती मेळावा “लाभ घेण्याचे आवाहन”

घाटंजी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार भरती मेळावा “लाभ घेण्याचे आवाहन”

573

(अयनुद्दीन सोलंकी),

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी येथील औद्योगिक प्रशिक्षण (Govt. ITI) संस्थेत बजाज ईलेक्ट्रीकल्स लिमिटेड तसेच एंड्युरंस टेक्नॉलॉजी लिमीटेड औरंगाबाद / पुणे या कंपनी करीता शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्यात यांत्रिक मोटार गाडी (एम. एम. व्ही.), कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रॅमिंग असिस्टंट (कोपा), इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स (आयसिटीएसएम), वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), जोडारी (फिटर) व संधाता (वेल्डर) या व्यवसायाच्या विद्यार्थ्यांनी सकाळी 10 वाजता पासून संस्थेत उपस्थित राहून भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरती झालेल्या प्रशिक्षनार्थ्यांस दरमहा 10 हजार 500 ते 12 हजार 273 रुपये स्टायपेंड मिळणार आहे. या भरती करिता उत्तीर्ण तसेच अपिअर्ड उमेदवार पात्र असणार आहे. सदर भरती मेळावा यशस्वी होण्यासाठी व जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व व्यवसायातील गेल्या पांच वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी व 2021 मधील अॅपियरींग विद्यार्थ्यांनी भरती मेळाव्यास उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा, तसेच अधिक माहिती साठी प्रवीण के. जयसिंगकार (8329087048), पियुष घोडमारे (9673866899), प्रवीण लाकडे (9158109988) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य प्रवीण गुल्हाणे यांनी केले आहे.