Home विदर्भ घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी व डाटा आँपरेटर...

घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी व डाटा आँपरेटर तालुका समन्वयक यांच्या विरुद्ध केलेल्या तक्रारीची चौकशी, चौकशी समितीतर्फे सुरू..?

323

( अयनुद्दीन सोलंकी ),

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पंचायत विस्तार अधिकारी पंजाब रणमले व संगणक डाटा ऑपरेटर तालुका समनव्यक अजय घोडाम यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची चौकशी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांनी सुरु केली असून चौकशी कामी उपस्थित राहण्याचे निर्देश जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपसरपंच रितेश बोबडे व पत्रकार कैलास कोरवते आदींना जिल्हा परिषदेकडुन देण्यात आले होते. सदर तक्रारीच्या अनुषंगाने 27 जानेवारी पर्यंत संपुर्ण प्रकरणाचे पुरावे सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद सदस्य आशीष लोणकर, जिप सदस्य सरिता जाधव, जिप सदस्य पावणीताई कल्यमवार, पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे व सदस्या नयना मुद्देलवार यांना दिले आहे.
घाटंजी पंचायत समिती अंतर्गत नियमबाह्य कामे सुरू असून 15 वा वित्त आयोगाच्या निधीत भ्रष्टाचार झाल्याच्या विरोधात अनेक तक्रारी वरिष्ठ स्तरावर केल्या होत्या. सदरच्या तक्रारी ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा कालींदा पवार आदींकडे देण्यात आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या निर्देशावरुन शुक्रवारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके व चौकशी समितीतील ईतर अधिकारी आदींनी घाटंजी पंचायत समिती कार्यालयात येऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीची चौकशी सुरू केली आहे.
जिल्हा परिषदेचे विनय ठमके यांचेसह लेखाधिकारी चंदनखेडे, खोब्रागडे आदींमार्फत चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर व डाटा आँपरेटर तालुका समन्वयक अजय घोडाम हे चौकशी दरम्यान उपस्थित नव्हते, हे येथे उल्लेखनीय.
पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी 2 वर्षा पासून अनेक ग्रामपंचायतीला नियमानुसार भेटी दिल्या नसुन 14 वा व 15 वित्त आयोगाच्या आराखड्यात बदल करून नियमबाह्य कामें केल्याचा आरोप लेखी तक्रारीतुन करण्यात आला होता. जसे हायमास्ट लाईट, सीसीटीव्ही कॅमेरा, RO PLONT, 14 वा वित्त आयोग, 15 वा वित्त आयोग, पेसा निधी व इतर साहित्य खरेदी Mh 47 व Mh 49 VIP ELECTRONICS या एकाच दुकानांतुन जादा भावाने खरेदी करण्यात आलेल्या असुन यात गट विकास अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी व डाटा आँपरेटर तालुका समन्वयक आदींची भागिदारी असल्याचा आरोप लेखी तक्रारीतुन करण्यात आला होता. विशेष म्हणजे घाटंजी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी एकाच दुकानातून इलेक्ट्रॉनिक्स साहित्य खरेदी केलेला असून वास्तविक पाहता MH 45 व MH 47 नावाचे कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स दुकान घाटंजी तालुक्यात अस्तित्वात नाही. त्यामुळे या दुकानाची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे यांनी सांगितले आहे. कोरोना काळात अनेक ग्रामपंचायतला विस्तार अधिकारी हे प्रशासक म्हणून नियुक्ती असतांना त्यांना 10 % मानधन शासनाकडुन देण्यात आले. अनेक ग्रामपंचायत सचिवांची दर महिण्याला बदली करणे, सरपंच यांनी तक्रार दिली तर ग्रामपंचायत ची DSC लॉक करणे, 15 वित्त आयोगाची ई निविदा रद्द करणे इत्यादी आरोप लेखी तक्रारीतुन करण्यात आले होते. मानोली व सायतखर्डा येथील प्रशासकांनी 15 वित्त आयोगाचा निधी नियमबाह्य RTGS ने उचल केल्याचा आरोप असून, गट विकास अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही. पंचायत समिती कार्यालयात वेळेवर येत नाही. गट विकास अधिकारी हे सरपंचाना घोडाम कडूनच कामे करुन घ्या, असे निर्देश देतात याबाबत चौकशी समिती मार्फत चौकशी सुरू आहे. चौकशीच्या वेळेस गट विकास अधिकारी सोनाली माडकर व डाटा आँपरेटर तालुका समन्वयक अजय घोडाम हे गैरहजर होते, हे विशेष.
गट विकास अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, डाटा आँपरेटर तालुका समनव्यक यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरुन सर्व तक्रारीचे पुरावे 27 जानेवारी पर्यंत सादर करण्याचे निर्देश चौकशी समितीचे प्रमुख विनय ठमके यांनी दिले आले.
यावेळी कार्यालयातील सर्व आस्थापना, कर्मचारी यांची दैनंदिन हजेरीचे मस्टर तपासण्यात आले. गैरहजर असणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना चौकशी समितीचे प्रमुख विनय ठमके यांनी दिले.