Home विदर्भ आयता येथील 14 आरोपी विरूध्द अँट्रोसिटी अँक्ट व भादंवि नुसार पारवा पोलीस...

आयता येथील 14 आरोपी विरूध्द अँट्रोसिटी अँक्ट व भादंवि नुसार पारवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल..!

387

( अयनुद्दीन सोलंकी )

घाटंजी / यवतमाळ – पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आयता येथे विष्णू नामदेव नैताम यांच्या तक्रारी व विनंती वरुन चौकशी करुन अखेर संशयीत आरोपी बेबी कोवे, गंगाराम कोवे, शशीकला पुसणाके, उत्तम मेश्राम, नामदेव धुर्वे, पुष्पा धुर्वे, गजानन वेट्टी, ज्ञानेश्वर कुसराम, नितीन कुसराम, संदीप कुसराम, केमदेव मुजमुले, दत्ता मांडवकर व दत्ता भोयर आदीं 14 आरोपी विरुद्ध अप क्रं .0014 अन्वये 15 जानेवारी रोजी भादंवि कलम 452, 427, 506, 143, 147, 149 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 3 (1) (r), 3 (1) (s) व 3 (1) (va) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहे. विशेष म्हणजे आरोपी दत्ता मांडवकर व दत्ता भोयर यांचे विरुद्ध अँट्रोसिटी अँक्ट चा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर उर्वरित 12 आरोपी विरूध्द भादंवि कलमानुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे करीत आहे.
फिर्यादी विष्णू नामदेव नैताम याची मोठी आई सोबत आरोपी बेबी कोवे हिने वाद घालण्याचा प्रयत्न केला असता विष्णू याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यात दोघांचेही भांडण झाले. 10 आँगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता फिर्यादीची मोठी आई विठाबाई दौलत सिडाम ही घरात बसुन असतांना तेवढ्यात घरावर दगड फेकण्याचा आवाज आला. तेव्हा सदरचे दगड बेबी कोवे हिने टिनावर फेकल्याचे दिसले. यावेळी फिर्यादी विष्णू नैताम याला संबंधित आरोपींनी लाथा बुक्याने व काठीने मारहाण करून जखमी करून जाती वाचक शिवीगाळ केली. 11 आँगस्ट 2021 रोजी सावळी सदोबा बिटचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक गजानन शेजुळकर यांनी चौकशी कामी आयता येथे गेले असता, त्यांनी विष्णू नैताम यांस तत्कालीन पारवा ठाणेदार गोरख चौधर यांनी पारवा पोलीस ठाण्यात बोल्यावल्याचे सांगितले. नंतर भादंवि कलम 354 अन्वये विष्णू नैताम यांस अटक केली.
आरोपी विष्णू नामदेव नैताम हा कारागृहातून जामीनावर सुटून आल्यानंतर 23 सप्टेंबर 2021 रोजी पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन, सदर प्रकरणात चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्या वरुन पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी फिर्यादीच्या विनंती वरुन सखोल चौकशी करुन 14 आरोपी विरूध्द 15 जानेवारी 2022 रोजी गुन्हे दाखल करण्यात आले. सदर प्रकरणातील 14 आरोपींची चौकशी उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे करत असून पुढील तपास सुरू आहे.
⚫➡️ आयता येथील घटना 10 आँगस्ट 2021 ची असुन मी पारवा पोलीस स्टेशनचा प्रभार 3 सप्टेंबर 2021 रोजी घेतला आहे. फिर्यादी विष्णू नैताम यांचा पारवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज प्राप्त झाला असून तक्रारदाराच्या विनंती वरुन व सखोल चौकशी करुन 15 जानेवारी 2022 रोजी 14 आरोपी विरूध्द विविध कलमान्वये पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणात अँट्रोसिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल असल्याने सदर प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे करीत आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
@ विनोद चव्हाण,
ठाणेदार, पोलीस स्टेशन, पारवा ता. घाटंजी