Home विदर्भ “आष्टी ग्रामपंचायत मध्ये पार पडला नोंदणी विवाह….

“आष्टी ग्रामपंचायत मध्ये पार पडला नोंदणी विवाह….

173

भातकुली -प्रतिनिधी -: धनराज खर्चान

 अमरावती – प्रत्येकाला आपला विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात आतिश बाजी करून जल्लोषात संपन्न व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असते ,शेकडो लोकांची पंगत आपल्या दारी बसावी असे स्वप्न उराशी बाळगण्यार्या वधू-वरांना आता आपले विवाह साधेपणाने आटोपल्या शिवाय पर्याय राहिलेला नाही. असाच विवाह भातकुली तालुक्यातील आष्टी ग्रामपंचायत कार्यालयातच कोरोना नियमाचे पालन करत वर वधू यांनी नोंदणी पद्धतीने विवाह पार पाडला. आष्टी येथील रहिवासी श्री रामदास खर्चान यांचे चिरंजीव राजेश खर्चान आणि हरतोटी येथील रहिवासी श्री राम कृष्ण धांडे यांची कन्या चि.सौ.का शीतल यांचा विवाह ग्रामपंचायत आष्टी च्या कार्यालयात विवाह नोंदणी पद्धतीने करण्यात आला, कुठलीच गर्दी गाजावाजा न करता दिनांक २०-०१-२०२२ गुरुवार ला सरपंच दिलीप जवंजाळ ,उपसरपंच दिनेश डवले ,ग्राम विकास अधिकारी लांडगे साहेब ,ग्रामपंचायत सदस्य संजय खरचान व ग्रा.प.सदस्य वर वधू चे आई – वडील तसेच नातेवाईक म्हणून निलेश डवले डॉ. एकनाथ डवले आदी उपस्थित होते. एवढ्याच मोजक्या व्यक्तींमध्ये हा विवाह पार पडला नोंदणी विवाहाच्या वेळी शासनाने दिलेल्या सर्व नियम व शर्तीचे पालन करण्यात आले. कार्यक्रमाला विवाह नोंदणी निबंधक (ग्रामविकास अधिकारी) सरपंच, उपसरपंच उपस्थित होते .