Home विदर्भ भातकुली नगरपंचायती वर राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे वर्चस्व कायम

भातकुली नगरपंचायती वर राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे वर्चस्व कायम

343

धनराज खर्चान

अमराती / भातकुली -: भातकुली नगर पचायत वर आमदार रवी राणा यांना वर्चस्व कायम ठेवण्यात यश आले आहे बुधवारी सकाळी १० वाजता भातकुली आय.टी. आय. येथे मतमोजणीला सुरवात झाली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात होता अवघ्या १ तासात सर्व १७ जगाचे निकाल हाती आले त्यापैकी ९ जागा जिंकून आमदार राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवून सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली महाराष्ट्रात जरी भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले असले तरी भातकुली नगर पंचायत मध्ये त्यांना अपेक्षेप्रमाणे यश संपादन करता आले नाही तर काग्रेसला सुद्धा या निवडणुकीत चमक दाखवता आली नाही शिवसेनेला गेल्या निवडणूक इतकेच यश मिळाले , युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकरत्यानी मोठ्या प्रमाणात फटाके आतशबाजी व गुलाल उधळून जलोष केला सुनील राणा यांनी भातकुली येथील मतदाराचे आभार मानले व अभिनंदन केले.